एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News: थोरल्याशी वाद, धाकल्यावर काढला राग! रॉडनं मारहाण करत तरूणाला संपवलं, अहिल्यानगर हादरलं!

Ahilyanagar Crime News: घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून देण्यात आला.

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी एकाच्या भावाला अमानुषपणे मारहाण करत संपवल्याची (Ahilyanagar Crime News) धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता) येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून (Ahilyanagar Crime News) सहा तरुणांनी त्याच्याच 19 वर्षाच्या भावाचं अपहरण करून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण (Ahilyanagar Crime News) करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक वसंत सदाफळ (वय 19 वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून देण्यात आला. सोमवारी (दि.14) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Ahilyanagar Crime News)

प्रतीक वसंत सदाफळ (वय 19 वर्षे) याचे शनिवारी (दि.12) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटलच्या समोरून अपहरण करण्यात आले होते. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये टाकून नेलं होतं, त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करून संपवलं होते. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला होता. सोमवारी या परिसरामध्ये शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिस पाटलांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली.

याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी रितेश सदाफळ याच्या फिर्यादीहून संशयित प्रशांत ऊर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळीविहीर ता. राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा. सावळीविहीर ता. राहाता) या सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृताचा भाऊ रितेश सदाफळ (वय 22) आणि संशयित सहा जण आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते. हे सहाही जण रितेशच्या मागावर होते. त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप आपल्या समोर येईल, तिथेच त्याचा गेम करायचा असा संशयितांचा 'प्लॅन' होता. मात्र, रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही, परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी रितेशचा भाऊ प्रतीकला अमानुषपणे मारहाण करत संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Crime News Sagar Moholkar: गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget