Ahilyanagar Crime News : राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात एका 26 वर्षीय कंत्राटी कामगाराचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 जूनच्या रात्री राहुरी-शनिशिंगणापूर रोडलगत ही घटना घडली आहे. कापूस सुधार प्रकल्पाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह आढळून आला. 

Continues below advertisement

धारदार शस्त्राने तोंड आणि पायावर वार केल्याच्या जखमा

मिळालेल्या माहितीनुसार, धारदार शस्त्राने तोंड आणि पायावर वार केल्याच्या जखमा मृतदेहावर दिसून आल्या आहेत. कैलास पोपट दोंदे असे मृत युवकाचे नाव असून तो राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पुण्यातील जुन्नर तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरलं, कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या वडिलांसह भावाला संपवलं 

पुण्यातील जुन्नर तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या वडिलांचा आणि भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वाद आणि मालमत्तेशी संबंधित कारणांचा तपास केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

Continues below advertisement

या घटनेत जयराम महादू मुकणे (वय - 60) व राजेंद्र जयराम मुकणे (वय -  27) यांची त्यांच्याच मुलाने बाबजी जयराम मुकणे यांने दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाबजी मुकणेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ओतूर पोलिस पुढील तपास करत आहेत.