नागपूर : शिखर समितीच्या बैठकीत सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी 81.57  कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला होता. यानिधीसह एकूण 244.87  कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय युवक कल्याण व क्रीडामंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या आसपास दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपचे निर्माण केले जाणार आहे. सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरीटेज पोस्ट ऑफीसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येईल. याशिवाय या परिसरातील तलाव, बागांच्या विकासाची कामेही घेतली जातील, असेही सुनील केदार यांनी सांगितले.

सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी दरवर्षी दहा कोटी

जिल्हा वार्षिक योजनेच्या सुत्रानुसार देय ठरणाऱ्या नियतव्ययाच्या व्यतिरिक्त आणखी रुपये 10 कोटी इतका अतिरिक्त निधी दरवर्षी जिल्हा नियोजन समिती, वर्धा  यांना सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या संवर्धनासाठी संवर्धन निधी म्हणून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.                         

राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती नवीन उपक्रम

'राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती' हा नवीन उपक्रम राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. अतिरिक्त निधीमध्ये या नवीन उपक्रमासाठी 39 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या नवीन उपक्रमामध्ये ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, गांधी विचार आणि प्रतिमा: हेरिटेज ट्रेलचा विस्तार, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरॲक्टीव्ह प्रदर्शन-3 डी इमेजिंग, मल्टी मिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंगभेद यासंबंधीचे विचार तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वाचा

Maharashtra Political Crisis Timeline : एकनाथ शिंदेंचं बंड ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा; सत्तासंघर्षाच्या दहा दिवसांत काय-काय घडलं?