बुलढाणा : युनोस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा, या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. नुकताच अमरावती विभागीय आयुक्त यांनी लोणार येथे भेट देऊन पुरातत्व विभाग, नगरपालिका, वन्यजीव विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकार्‍यांची बैठक घेतली. 2020 मध्ये लोणार सरोवराला "रामसर दर्जा " मिळालेला आहे . आता यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच दिल्ली येथे यूनेस्कोची जागतिक वारसा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत राज्य शासनाकडून हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी यावेळी दिली.


देशातील जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेली 40 ठिकाणी आहेत. लोणार ला हा दर्जा मिळाल्यास 41 व स्थळ हे ठरणार आहे . या यादीमध्ये 1983 साली अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा समावेश झाला होता तर 1987 मध्ये एलिफंटा लेणी , 2004 मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक , 2013 मध्ये पश्चिम घाट आणि 2018 मध्ये मुंबईतील विक्टोरिया कॉथिक चा समावेश झाला होता.


उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती


लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.


लोणार हे जगातील सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला होता. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या