Thane ACB Action: मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Mumbai ACB) ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) मुख्यालयात संध्याकाळी (2 ऑक्टोबर ) उशिरा धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे (Shankar Patole) यांच्या कार्यालयात ही धाड टाकण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाखांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी त्यांना रात्री (2 ऑक्टोबर ) उशिरा अटक करण्यात आली. तसेच पाटोळे यांच्यासोबत आणखीन एक जणाला ताब्यात (Mumbai ACB) घेण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि या कारवाईचे स्वागत केले. तसेच ठाणे महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

Continues below advertisement

अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल 25 लाखांची मागणी (Mumbai ACB Action on Thane Municipal Corporation)

ठाणे पालिकेच्या वर्धापन दिनीच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे एसीबीच्या जाळ्यात सापडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच ठाणे शहारातील बेकायदा बांधकामे चर्चेत असून पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यातच घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल 25 लाखांची मागणी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी बिल्डरकडे केली. याप्रकरणी बिल्डरने तक्रार केल्यानंतर मुंबई एसीबीने (Mumbai ACB) सापळा रचत पाटोळे यांना 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून फुले उधळत एसीबीच्या कारवाईचे स्वागत (Social Activists Welcome ACB Action by Showering Flowers)

दरम्यान, गेली अनेक वर्ष ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून बेकायदा बांधकामात बक्कळ पैसा कमावणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केली आहे. ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा घालून हि कारवाई केली. अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी असलेला अतिक्रमण हटविण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. यात 15 लाख रोख आणि 10 लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा केले होते. मात्र पैसे घेऊनही काम न केल्याने अभिराज डेव्हलपरच्या अभिजीत कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती. परिणामी या तक्रारीवरून मुंबई एसीबीने धडक कारवाई करत हा प्रकार उजेडात आणला आहे.

Continues below advertisement

संबंधित बातमी :