- 10 ते 12 वाजेपर्यंत फनी वादळ ओदिसा किनारपट्टीवर धडकण्याची चिन्हं, यंत्रणा अलर्टवर, एनडीआरएफची 81 पथकं तैनात, रेल्वे, हवाई वाहतूक बंद
- पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारींचा 6 मेपर्यंत निकाल लावा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
- मुलांच्या घोषणाबाजीच्या व्हिडीओवरुन प्रियंका गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस, मोदींविरोधातल्या घोषणा कुणी शिकवल्या?, तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
- पंतप्रधान मोदींना चोर म्हणणं राहुल गांधींना महागात पडण्याची शक्यता, सुरतच्या कोर्टाकडून काँग्रेस अध्यक्षांना समन्स
5. राज ठाकरेंना प्रचारसभांचा खर्च सादर करावा लागणार, निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेंची माहिती, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
- यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला मराठा आरक्षणाचा लाभ नाही, नागपूर खंडपीठाचा निर्णय, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार
- राज्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाव्ही
- डॉ. झाकीर नाईकविरोधात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल,193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप
- राजगडच्या पायथ्याला उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा, 200 जणांवर उपचार सुरु
- सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर सनसनाटी विजय, मुंबईचं आयपीएलच्या प्ले ऑफचं तिकीट कन्फर्म