1. मुंबईतील शिथिलता रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय; पूर्वीप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार


 

  1. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 37 लाखांच्या वर, तर अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू


 

  1. महाराष्ट्रात काल दिवसभरात 841 नवे कोरोना बाधित रुग्ण; राज्यात कोरोना बाधितांची संख्या 15,525 वर


 

  1. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चारशेपार; काल दिवसभरात 92 नवे रुग्ण, तर 92 पैकी सर्वाधिक रुग्ण मालेगावात


 

  1. शाळांसह वाहतूक व्यवस्था लवकर सुरु होणार नाही; ठाकरे सरकारचा गो कोरोना प्लॅन, हळूहळू लॉकडाऊन उठवणार




  1. दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना संचारबंदीत शिथिलता; तपासणीच्या कामांकरिता संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पास देण्यात येणार


 

  1. मुंबईला जाणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत नो एन्ट्री, सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना नियम लागू; केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा निर्णय


 

  1. काळा बाजार करताना जप्त केलेले पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर तातडीनं वैद्यकीय वापरात आणावे; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी यांची हायकोर्टात याचिका


 

  1. तेलंगणात लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला, मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांची घोषणा; तेलंगणात आतापर्यंत एक हजार कोरोनाग्रस्त


 

  1. जम्मू-काश्मीरमधील पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या पुन्हा कुरापती; लपून बसलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु