नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याला नागपुरकरांना उत्तम प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात मनपाच्या केंद्रांमधून तब्बल 5 हजार 615 जणांनी लस मात्रा घेतली आहे. पुढील 75 दिवस चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. पहिल्याच दिवशी शहरातील विविध केंद्रांवर 2117 नागरिकांनी बुस्टर डोज घेतले होते. तर शनिवारी दुसऱ्या दिवशी 3498 जणांनी बुस्टर डोस घेतला.
 
शनिवारी सर्व केन्द्रांवर 12 ते 14 वर्षावरील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली गेली. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हिशील्ड चे पहिला, दुसरा आणि बुस्टर डोज दिले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, अनुसंधान केंद्र मध्ये फक्त कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. 


कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 


मनपाच्या या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस सोमवार ते शनिवार उपलब्ध


झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन
• कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
• जयताळा यूपीएचसी, जयताळा
• खामला यूपीएचसी, खामला नागपूर 
झोन क्र. 2 धरमपेठ झोन
• फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. 3
• सदर रोग निदान केन्द्र, रेसिडेन्सी रोड, सदर 
• सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
• के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
• डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 3 हनुमाननगर झोन
• मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
• नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
• हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर
झोन क्र. 4 धंतोली झोन
• GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फक्त कोव्हॅक्सीन
• बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
• आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• एम्स हॉस्पीटल, मिहान, नागपूर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 5 नेहरूनगर झोन
• बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
• ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
• नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
• दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर
झोन क्र. 6 गांधीबाग झोन
• महाल रोग निदान केंद्र, महाल (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
• मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा
झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन
• मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
• कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
• जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
• शांती नगर यूपीएचसी, शांती नगर
• सतरंजीपूरा यूपीएचसी
झोन क्र. 8 लकडगंज झोन
• डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
• पारडी युपीएचसी, पारडी
• भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
• हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर
झोन क्र. 9 आशीनगर झोन
• पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
• कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
• शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर
• बंदे नवाज युपीएचसी
• गरिब नवाज युपीएचसी
• आंबेडकर हॉस्पीटल, कामठी रोड येथे फक्त कोव्हॅक्सीन 
झोन क्र. 10 मंगळवारी झोन
• गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
• झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
• इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
• नारा यूपीएचसी, नारा