Palghar School News: शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळा ऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये (Palghar School Student News) समोर आली आहे. जव्हारच्या जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर लांब असलेल्या झर्‍यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं. मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने या शिक्षकांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलात लपून काढला. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. 

Continues below advertisement

मारहाण करणारे शिक्षक लोकनाथ जाधव यांच्याविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक तक्रारी केल्या असताना गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत 96 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शिक्षक लोकनाथ जाधव हे उशिराने येणे, दिवसभर मोबाईलमध्ये असणे, तसंच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष असे प्रकार करत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालकांचं ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय, काय घडलं? (Palghar School News)

जव्हार तालुक्यातील जि. प. शाळा जांभूळमाथा येथे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांवर निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाळा म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्याचं ठिकाण… पण येथे तर शिक्षकाच्या मनमानीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने पालकांसोबतच येथील उपसरपंच सुभाष भोरे आक्रमक होत जव्हार पंचायत समितीच्या गट विकास तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतले असल्याचे भोरे यांनी सांगितले.

Continues below advertisement

विद्यार्थी आपला जीव वाचवत बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले- (Palghar School Student News)

शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी शिक्षक जाधव यांनी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. दूर अंतर असल्याने या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला, हे निमित्त घेत या शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच उर्वरित विद्यार्थी आपला जीव वाचवत बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्याप वावेत कोणतेही कारवाई झालेली नाही. असे भीतीचे सावट कायम ठेवणारा शिक्षक हा अंगणात कांशिलात उभे करणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी सरळ गैरहजेरी…या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ उद्भवली आहे. शाळेत 1 ली ते 8 वी पर्यंत तुकड्याअसून येथील पट संख्या ही 96 आहे. शाळेची नियमित वेळ ही10.30 पण शिक्षक महोदय 11.15-11.30 वाजता हजेरी लावतात, असा पालकांचा आरोप होत असून निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे.अशी परिस्थिती असताना देखील गावकऱ्यांमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा आहे की, या शिक्षकाच्या पाठीशी कोण? एवढा उर्मटपणा कोणामुळे?” यांना वरदहस्त कुणाचा असे नाना प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत.अखेर या तक्रारींची दखल घेत ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कमिटी, पालक आणि विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेत भोरे यांनी शिक्षण विभागाला थेट सवाल करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...