मिरजेत भरदिवसा दरोडा, बँकेच्या गाडीची काच फोडून 30 लाख लंपास
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2017 02:20 PM (IST)
सांगली: मिरजेत भरदिवसा मुख्य बाजारपेठेतून 30 लाखांची चोरी असून, चोरट्यांनी एटीएममध्ये पैसे भरायला आलेल्या बँकेच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास केली. मिरजेतील सराफकट्टा परिसरात एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. येथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एटीएममध्ये पैसे भरायला आलेल्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी 30 लाख रुपये लांपास केले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या गाडीवरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. शिवाय मिरज शहरामधून बाहेर जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी केली आहे. याशिवाय बँकेच्या एटीएमचे सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.