1st September 2022 Important Events : सप्टेंबर (September) महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. सप्टेंबर महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 सप्टेंबरचं दिनविशेष.
1906 : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना
बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत 1 सप्टेंबर 1906 रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना करण्यात आली.
1911 : पुण्यात भारत गायन संस्थेची स्थापना
पं. भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने 1 सप्टेंबर 1911 रोजी पुण्यात भारत गायन संस्थेची स्थापन केली.
1956 : भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना
1956 मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे 245 भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयीकरण केले . 19 जून 1956 रोजी संसदेत 'एलआयसी' हा कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.
1985 : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले
1921 : माधव मंत्री यांचा जन्मदिन
क्रिकेट मैदान गाजवणाऱ्या माधव मंत्री यांचा जन्म 1 सप्टेंबर 1921 रोजी नाशकात झाला. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू अशी माधव मंत्री यांची ओळख आहे.
1926 : विजयदन देठा यांचा जन्म
विजयदन देठा हे राजस्थानी लेखक होते. 1 सप्टेंबर 1926 रोजी त्यांचा जन्म झाला. तर 10 नोव्हेंबर 2013 साली त्यांचे निधन झाले.
1931 : अब्दुल हक अन्सारी यांचा जन्मदिन
अब्दुल हक अन्सारी यांचा 1 सप्टेंबर 1931 मध्ये जन्म झाला. अब्दुल हक अन्सारी हे भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान होते. 3 ऑक्टोबर 2012 साली त्यांचे निधन झाले.
1949 : पी. ए. संगमा यांचा जन्म
लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा 1 सप्टेंबर 1949 रोजी जन्म झाला. पी. ए. संगमा हे आधी राष्ट्रीय कॉंग्रेसचे व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य होते. त्यानंतर संगमा यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा एक नवाच राजकीय पक्ष स्थापन केला.
1970 : पद्मा लक्ष्मी यांचा जन्म
1 सप्टेंबर 1970 रोजी पद्मा लक्ष्मी यांचा जन्म झाला. त्या भारतीय-अमेरिकन अभिनेत्री असण्यासोबत लेखिकादेखील होत्या.
1581 : गुरू राम दास यांचे निधन
गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू होते. 1 सप्टेंबर 1581 रोजी गुरू राम दास यांचे निधन झाले.
1893 : काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन
न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे 1 सप्टेंबर 1893 रोजी निधन झाले.
2020 : जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन
1 सप्टेंबर 2020 रोजी जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन झाले. ते पोलिश स्पीडवे रायडर आणि विश्वविजेते होते.
संबंधित बातम्या