धोनीच्या अनटोल्ड स्टोरीतील चार मोठ्या चुका
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यापासून धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सारे रेकॉर्ड या सिनेमाने आतापर्यंत मोडीत काढले आहेत. या सिनेमाचे साऱ्यांनीच कौतुक केले असले तरी, या सिनेमाच्या कथेत अनेक चुका आहेत, याचा रिअल लाईफशी काही एक संबंधही नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेमात धोनी आणि त्याची पत्नी साक्षी लग्नापूर्वी कोलकाताच्या ताज बंगॉल हॉटेलमध्ये भेटल्याचे दाखवलं आहे. विशेष म्हणजे, सिनेमात साक्षीची भूमिका साकारणारी कायरा आडवाणी धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतला पाहता क्षणी ओळखत नसल्याचं दाखवलं आहे. मात्र, रिअल लाईफमध्ये साक्षी आणि धोनी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. धोनी आणि साक्षी एकाच शाळेत शिकत होते.
सिनेमात धोनी फिनोलेक्स, लावा फोन, गार्निअर, आदी उत्पानांसाठी जाहिरात करताना दाखवले आहे. यातील धोनीला 2007 च्या विश्व चषकानंतर लावा फोन्सच्या जाहिराती करताना दाखवलं. मात्र, रिअल लाईफमध्ये लावा फोन 2009 मध्ये बाजारात दाखल झाला होता. तसेच गार्निअर कंपनीची जाहिरात धोनीने आद्याप केलेली नाही.
या सिनेमात धोनीची एक बहीण दाखवण्यात आले आहे. मात्र, रिअल लाईफमध्ये त्याचा एक भाऊही असून त्याचे नाव नरेंद्र सिंह धोनी असे आहे. त्याचा संपूर्ण सिनेमात उल्लेखही नाही.
सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धोनीला एकाच घरात दाखवण्यात आले आहे. मात्र, धोनी 2011च्या विश्व चषकापर्यंत रांचीमधील आपल्या आलिशान बंगल्यात राहायला गेला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -