✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आमीर, काजोलसोबत काम करू नको, शाहरूखचा सल्ला

एबीपी माझा वेब टीम   |  09 Aug 2016 06:03 PM (IST)
1

काजोल आणि शाहरूख यांच्यातील ऑफ स्क्रिन मैत्री सर्वांनाच माहित आहे. शाहरूख तिचे कौतुक करताना काजोल एक प्रामाणिक कलाकार असल्याचे सांगतो. माझी मुलगी सुहानाला अॅक्ट्रेस बनायची इच्छा आहे, त्यामुळे तिने काजोलकडून अभिनयाचे धडे गिरवावेत, असे मला वाटते.

2

बॉलिवूडची ही सुपरहिट जोडी रोहित शेट्टीच्या दिलवाले या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचे साऱ्यांनीच कौतुक केलं.

3

दैनंदिन जीवनात तिच्याशी चर्चा होत नसल्याचे तो सांगतो. मात्र, जेव्हा या दोघांची भेट होते, तेव्हा त्यांच्यामध्ये रंगतदार चर्चा होते. काजोलचं व्यक्तिमत्त्व अतिशय बोलकं आहे. काजोललाही एका मुलाखतीत गेल्या 20 वर्षात शाहरूखमध्ये बदल झाले आहेत का? असे विचारले. तेव्हा तिने, ''आम्ही सर्व कलाकार आहोत. आमच्यात वेळेनुसार बदल होतो. शाहरूख एक उत्तम कलाकार आहे. मला त्याच्यासोबत काम करायला आवडतं, असे तिने सांगितले होते.

4

बॉलिवूडचा हा बादशाह जेव्हा पहिल्यांदा काजोलला भेटला, तेव्हा तो अतिशय निराश झाल्याचे सांगितले होते. ''बाजीगर चित्रपटात काजोलसोबत आपण काम करत होतो, तेव्हा आमीरने मला काजोलसंबंधी विचारले होते. त्यावेळी मी मेसेज करून तिच्यासोबतचे अनुभव चांगले नसल्याचे आमीरला सांगितले होते. तिचे कामाकडे लक्ष नसते. त्यामुळे तिच्यासोबत तू काम करू शकणार नाहीस,'' असा सल्लाही त्याने आमीरला दिला होता. ''पण जेव्हा मी काजोलचे मोठ्या पडद्यावरील काम पाहिले, तेव्हा मी स्वत:च आमीरला फोन करून माझ्या पूर्वीच्या वक्तव्यात सुधारणा केली. ''तिचा अभिनय पडद्यावर अतिशय उत्तम असून पडद्यावर तिची एक वेगळीच जादू आहे. असे मी आमीरला सांगितले होते.''

5

शाहरूख पुढे म्हणाला की, ''बाजगीर चित्रपटाच्या सेटवर काजोलशी मैत्री झाल्याचे तिला अजूनही लक्षात आहे. त्यावेळी काजोल बाजीगर चित्रपटाच्या सेटवर मेकअप मॅनसोबत मराठीत वाद घालत होती. जेव्हा शाहरूखने काजोलचा आवाज ऐकला, तेव्हा त्याने उपस्थितांना तिच्याविषयी विचारले. कारण, तो आवाज ऐकून डोकं दुखत होतं, तो अतिशय चिडला होता. पण तरीही काजोल वाद घालणे सुरुच होते. पण नंतर शाहरूखनेच तिला शांत केले, अन् अशाप्रकारे या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली.''

6

मोठ्या पडद्यावरील किंग खान आणि काजोलच्या जोडीने नेहमीच अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या दोघांच्या जोडीची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख आहे. काजोलसोबत काम करणं, तिला मिस करत असल्याची खंत शाहरूखने अनेकवेळा बोलूनही दाखवली. कारण शाहरूखच्या मते, काजोलची मोठ्या पडद्यावर एक वेगळीच जादू आहे. या जोडीने बाजीगर, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेसारखे सुपरहिट चित्रपट दिले. पण शाहरूख आणि काजोलचे सुरुवातीचे अनुभव चांगले नसल्याचे काहीजणांनाच माहित आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • आमीर, काजोलसोबत काम करू नको, शाहरूखचा सल्ला
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.