'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाच्या यशानंतर धमाल पार्टी
केक कापताना चित्रपटातील सर्व कलाकार.
नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिने ही पार्टीत उपस्थिती लावली.
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर.
अभिनेत्री उज्ज्वला चोप्राने तिच्या मुलीसोबत पार्टीला हजेरी लावली.
चित्रपटातील चाइल्ड कलाकार पण पार्टीची मज्जा घेत होती.
उरी चित्रपटातील मुख्य कलाकार विक्की कौशल आणि यामी गौतम.
या दरम्यान विक्की कौशल मस्तीच्या मुडमध्ये होता. त्याने दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत अशी पोज दिली
अभिनेत्री राधिका मदान हिने अशी पोज दिली.
पार्टीत परेश रावलही उपस्थित होते. या चित्रपटात परेश रावल यांनी अजित दोभाल यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.
या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल याचा 'How's The Josh' हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. म्हणून पार्टीचं ड्रेसकोड 'How's The Josh'हा मजकूर असलेला टी शर्ट ठेवण्यात आला होता.
'उरी द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने पाच दिवसात तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या याच यशाच्या निमित्ताने पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत चित्रपटातील कलाकारांसह इतर कलाकारही उपस्थित होते.