2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांचा राहिला दबदबा
रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या 'पद्मावत' या चित्रपटाला घेऊन बराच वाद झाला होता. मात्र त्याही पेक्षा जास्त या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर चालली. संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाने 300 कोटींचा गल्ला कमावला होता. तसेच 2018 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात पद्मावत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'सोनू के टीटू की स्वीटी' हा चित्रपट इतका हिट झाला की, या चित्रपटाने अभिनेता कार्तिक आयर्नला सुपरस्टार बनवलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं होत. ज्यात कार्तिकसह नुसरत भरुचा आणि सनी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने 108 कोटींची कमाई केली.
टायगर श्रॉफच्या 'बागी 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. बागी 2 ने तब्बल 165 कोटी रुपयांची केली. तसेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत बागी 2 पाचव्या स्थानावर आहे. टायगर श्रॉफ, रणदीप हुड्डा, दिशा पाटनी आणि मनोज वाजपेयी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
2018 मध्ये आलेला आलिया भट्ट हिच्या 'राजी' या चित्रपटाला प्रेक्षकाची चांगलीच पसंती मिळाली. मेघना गुलजार दिग्दर्शीत 'राजी' हा चित्रपट भारतीय गुप्तहेराच्या जीवनावर आधारित आहे. या गुप्तहेराने 1971 चा युद्ध जिंकण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. या चित्रपटाने 123 कोटी रुपये कमावले.
अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत 'संजू' या चित्रपटाने या वर्षात सर्वाधिक कमाई केली आहे. संजूने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली . अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं. संजूमध्ये रणबीरसह सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, परेश रावल, आणि बोमन ईराणी यांची प्रमुख भूमिका आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा कॉमेडी हॉरर 'स्त्री' चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटानेही 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धासहीत पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा हे ही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. या चित्रपटात हॉरर कॉमेडीसह स्त्रीचा आदर करायला पहिजे असा संदेशही देण्यात आला आहे.
अभिनेता आयुष्मान खुराणा याचा 'बधाई हो' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 37 कोटी खर्चात बनवलेल्या या चित्रपटाने तब्बल 136 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात आयुष्मान खुराणासह अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराज मुख्य भूमिकेत आहेत.
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट 2.0 या सिनेमाने प्रेक्षकांना वेगळ्याच जगात नेलं. 2.0 हा चित्रपट 2018 या वर्षात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला कमावणाऱ्या चित्रपटाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हिंदी डब झालेल्या या चित्रपटाने 188 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -