मुंबई : तान्हाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतरचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. खरंतर तिसऱ्या आठवड्यापर्यंत फिल्म बॉक्स ऑफिसवर जोरदार टीकून राहतेच असं नाही मात्र तान्हाजीने तिसऱ्याही आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपटाचं बजेट 150 कोटी होतं मात्र हा चित्रपट आता लवकरच 200 कोटी पार करण्याच्या मार्गावर आहे.
केवळ विकेंड्सलाच नाही तर विक-डेजलासुद्धा प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. सोमवारी चित्रपटाने 8.17 कोटींची कमाई केली, मंगळवारी 7.72 कोटी तर बुधवारी 7.09 कोटी कमावले. आतापर्यंत एकूण कमाई पाहिली तर ती 190.43 कोटी अशी आहे जी जवळपास 200 कोटींच्या घरात जाण्याच्या मार्गावरच आहे.
तान्हाजी चित्रपटात काजोल आणि अजय या जोडीला प्रेक्षकांनी तब्बल 12 वर्षांनी पाहिलं आहे, आणि सोबतच सैफ अली खान हा खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसला. सैफच्या भूमिकेचं कौतुक तर झालंच मात्र त्यांच्या चित्रपटाच्या यशासाठी खोटा इतिहास दाखवल्याच्या आरोपामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं. चित्रपटाला अनेक कॉन्ट्रोवर्सिसने गाठलं, अगदी अक्षय कुमारच्या अॅडव्हरटाईजमेंटमधील मावळ्यांच्या वापरापासून, चित्रपटातील ऐतिहासिक घटनांपर्यंत अनेक गोष्टींमुळे चित्रपट वादात आला.
Ajinkya Dev | 'तान्हाजी'मध्ये भ्रष्ट इतिहास नाही, अभिनेते अजिंक्य देव यांच्याशी गप्पा | ABP Majha
काय आहे तान्हाजी चित्रपट?
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी कामी आलेला एक मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तान्हाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर अजय देवगण याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल या चित्रपटात तान्हाजी मलुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
मराठी अभिनेते देवदत्त नागे, अजिंक्य देवदेखील या चित्रपटामध्ये भूमिका साकरत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. चित्रपटात सैफ अली खान हा मोघल किल्लेदार उदयभान राठोड याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकणार आहेत. 'तान्हाजी'चे बजेट तब्बल 150 कोटी रुपये इतके आहे.
Political Leaders on Tanhaji Spoof | तान्हाजी चित्रपटाच्या व्हायरल व्हिडीओवर नेत्यांच्या प्रतिक्रिया
चित्रपटावर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांचा आक्षेप
'तान्हाजी' या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.
तान्हाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तान्हाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली. तसेच या चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अथवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास द्यावी अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली.