आगामी सिनेमासाठी सनी लिओनीचा हटके मेकअप
बॉलिवूडची सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी विविध विषयांवरुन नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या आगामी सिनेमासाठी करण्यात आलेल्या मेकअपमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मेकअपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रोस्थेटिक मेकअपद्वारे त्या व्यक्तीचा चेहरा बदलला जातो. तसेच हा मेकअप करण्यासाठी 5 ते 12 तास वेळ लागतो.
सनीने आपल्या आगामी सिनेमासाठी प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.
वास्तविक, सनीने आपल्या आगामी सिनेमासाठी जरा हटके मेकअप केला आहे.
दुसरीकडे सनी सिनेमासोबत आपल्या मुलीसोबत वेळ घालवणे पसंत करत आहे. गेल्या काही दिवसात अनेकवेळा सनी आपल्या मुलीसोबत विमानतळावर पाहायला मिळाली.
यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋषी कपूर, राजकुमार राव, प्रियंका चोप्रा, हृतिक रोशन साऱख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या सिनेमांमध्ये हा मेकअप केला आहे.
सनी संजय दत्तच्या भूमी सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. संजय दत्तचा हा सिनेमा येत्या 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.