'रईस' शाहरुखच्या प्रमोशननं घेतला एकाचा बळी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनं काल रात्री शाहरुख दिल्लीच्या दिशेनं मार्गस्थ झाला होता.
त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख हा ट्रेनचा प्रवास केला होता.
गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होवून चेंगराचेंगरी झाली. यात फरीद खानचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह चार जण जखमी झालेत.
मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली.
गुजरातमधील वडोदरा स्टेशनवर ही दुर्घटना घडली. वडोदरा स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्याला आपला जीव गमावावा लागला आहे, तर दोन पोलीस जखमीही झाले आहेत.
रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदऱ्यात चाहत्यांची झुंबड उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -