सलमानच्या 'त्या' वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट
महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करताना पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर प्रसिद्ध सेलिब्रिटी सुहेल सेठ यांनी सलमान विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी पाकिस्तानी कलाकार व्हिजाच्या आधारे देशात येत असले, तरी त्यांचे काही दहशतवादीही व्हिजाचाच आधार घेऊन भारतात येतात. व्हिजाच्या आधारे त्यांचे कसलेही चाळे खपवून घेऊ नयेत, असं म्हटलं आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले आहे.
यावर सिनेमा दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परतणे, योग्य नसल्याचे म्हटलं आहे. तर सेंसर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी यावर निर्णय घेणे सरकारचे काम असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहनुभूती दाखवताना, ''ते कलाकार आहेत दहशतवादी नव्हेत. सरकार त्यांना परवानगी आणि वीझा देते. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेलेले दहशतवादी होते. हे कलाकार आहेत, सरकार कलाकारांना वर्क परमीट देते,'' अशी प्रतिक्रीया दिली होती.
भारतीय सैन्य दलाकडून यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर, सैन्यदलाचे सर्वच स्तरानंतर अभिनंदन होत आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानपासून अक्षय कुमार साऱ्यांनीच भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केले आहे. याच दरम्यान पाकिस्तानी कलाकरांना देशातून पिटाळण्यात यावे अशी मागणी जोर धरत असताना यावर बॉलिवूडचा भाईजान सलमानने मात्र पाकिस्तान कलाकरांसंदर्भात सहानुभूती दाखवल्याने वाद ओढावून घेतला आहे.
यापूर्वी सैफ अली खान आणि करण जोहर यानेही पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याचं समर्थन केलं होतं. तर इंडियन मोशन फिचर्स प्रोड्यूसर असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यास नकार दिला आहे.
सलमानच्या या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा पाकिस्तान कलाकारांना पुन्हा धमकी दिली, तसेच सलमानच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. '' ते पाकिस्तानचे अतिरेकी नसले, तरी इन्फॉर्मर नसतील कशावरुन'' असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय सलमान खानने खुशाल पाकिस्तानात जावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंच्या धमकीनंतर पाकिस्तानी कलाकरांनी भारतातून पलायन केले आहे. करन जौहरच्य 'ए दिल है मुश्किल' सिनेमातील फवाद खान, आणि शाहरुख खानच्या आगामी 'रईस' या सिनेमातील महिरा खान हे दोघेही परतले आहेत.
शाहरुखसह अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा, सनी देओल, अनुपम खेरसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सैन्यदलाचे अभिनंदन केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -