'खान'दानाला धक्का, 'सिम्बा'ची डरकाळी
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तचा बायोपिक 'संजू' (342 कोटी) हा 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2018 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटामुळे बॉलिवूडसाठी नववर्षाची सुरुवातही गोड झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा'ने 227 कोटींची कमाई केली आहे.
2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सिम्बाने तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. विशेष म्हणजे या यादीतील टॉप 4 सिनेमांमध्ये रणवीरच्या दोन चित्रपटांचा समावेश असून खान मंडळींचं वर्चस्व मोडित निघालं आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, रणवीरचीच भूमिका असलेला दीपिका-शाहीदसोबतचा 'पद्मावत' (302 कोटी) या यादीत दुसरा आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 'सिम्बा' आहे.
2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दंगल (387 कोटी) पहिल्या स्थानी असून त्यानंतर संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, पद्मावत, सुलतान, धूम 3 या चित्रपटांचा क्रमांक लागतो.
'सिम्बा'ने शाहरुख-दीपिकाच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'ने 227.13 कोटींची कमाई केली होती. लाईफटाईम डोमेस्टिक (भारतातील) कलेक्शनमध्ये सिम्बा सध्या नवव्या स्थानावर असून चेन्नई एक्स्प्रेसची दहाव्या क्रमांकावर पिछेहाट झाली आहे.
रजनीकांत-अक्षयकुमार यांची भूमिका असलेला '2.0' हा चित्रपट चौथ्या स्थानावर (188 कोटी) आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -