नर्गिस फाखरीची भारतात 'वापसी'

बॉलीवूडची अभिनेत्री नर्गिस फाखरीचे काल मुंबई विमानतळावर आगमन झाले. तिच्या आगमनानंतर फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर तिने आपला चेहरा लपवला.
मात्र, नर्गिसने यावर ट्विट करून उत्तर दिले. तिने आपला अपकमिंग चित्रपट बंजोच्या प्रमोशनसाठी लवकरच भारतात येणार असल्याचे ट्विट केले होते.
मात्र, तिने भारतात परतल्यानंतर, आपला चेहरा माध्यमांपासून लपवण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी नर्गिस मुंबई सोडून यूएसमध्ये कायमची स्थाईक झाल्याची चर्चा रंगली होती.
बॉलीवूडची अभिनेत्री नर्गिस फाखरीचे काल मुंबई विमानतळावर आगमन झाले. तिच्या आगमनानंतर फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर तिने आपला चेहरा लपवला.
नर्गिसच्या परतण्याने तिने मुंबई सोडून यूएसमध्ये स्थाईक होण्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
फोटो : Manav Mangalani
नर्गिसने आपला एक व्हिडीओही इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.