मनोज वाजपेयी कराटे शिकवताना...
दोरी उडी हा तसा सामान्य व्यायामाचा प्रकार, पण मनोजला या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान रिटेकमुळे अनेकदा दोरींच्या उड्या माराव्या लागत होत्या. कधीकधी तर एका टेकसाठी 100 दोरीच्या उड्या मारव्या लागल्या.
या भूमिकेला न्याय देण्यासाठी मनोज कठोर परीश्रम घेत आहे. या चित्रपटासाठी त्याने कराटेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्याची चांगली प्रॉक्टिसही केली.
मनोज वाजपेयी आपला आगामी चित्रपट 'बुधिया सिंह बॉर्न टू रन' या चित्रपाटसाठी प्रचंड उत्साही आहे. या चित्रपटात तो प्रशिक्षक बिरंचि दास यांच्या भूमिकेत आहे.
बॉलीवूड अभिनेती मनोज वाजपेयी आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यासाठी कठोर परीश्रम घेत असतात. आणि त्यांचे हे परीश्रम प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात.
वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कोड रेड फिल्म प्रोडक्शनद्वारा निर्मित आणि सौमेंद्र पाधी द्वारा दिग्दर्शित 'बुधिया सिंह बॉर्न टू रन' हा चित्रपट येत्या 5 ऑगस्ट 2016 रोजी प्रदर्शित होत आहे.
'बुधिया सिंह बॉर्न टू रन' चित्रपटात मनोज वाजपेयी ज्यूडो कराटे आणि दोरीच्या उड्यासारखे प्रकार करताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी त्याने आपल्या फिटनेसकडेही लक्ष दिले आहे. मनोज वाजपेयी हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा चित्रपट मानतो.