उडता पंजाबची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०.०५ कोटीची कमाई केली. तर शनिवारी ११.२५ कोटी, रविवारी १२.५० कोटी, ,सोमवारी ४.०५ कोटी, मंगळवारी ४ कोटी, बुधवारी ३.४० कोटी कमाई केली.
या चित्रपटात शाहिद कपूर, करीना कपूर-खान, आलिया भट्ट आणि दिलजीत देसांझ मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपट पंजाबमध्ये झपाट्य़ाने वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या उद्योगावर भाष्य करणारा असून चित्रपटाची कथा एकूण चार व्यक्तींभोवती फिरते.
रिलिज होण्याआधीच चित्रपटाला पायरसिचे ग्रहण लागल्याने किती कोटीची कमाई करणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण तरीही चित्रपटाने आतापर्यंत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट समिक्षक आणि अनेक बॉलीवूडचे सेलिब्रेटी याचे कौतुक करीत आहेत.
गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटाने ४५.७० कोटीचा गल्ला गोळा केला.