हिरो नंबर वनचा कुटुंबियांसोबत बर्थडे सेलिब्रेशन

गोविंदाने 11 मार्च 1987 रोजी सुनिता यांच्यासोबत लग्न केलं होतं. गोविंदा आणि सुनिताला दोन मुलं आहे. मुलगा यशवर्धन आणि मुलगी टिना आहुजा. टिनाने नुकतेच चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोविंदाला शक्ति कपूर आणि कादर खान यांच्यासोबत चित्रपटात अनेक वेळा पाहिलं गेलं आहे. शक्ति कपूर सोबत 42 तर कादर खान यांच्यासोबत गोविंदाने 41 चित्रपटात काम केलं आहे.

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार या ज्येष्ठ अभिनेत्यांना गोविंदा आपले आदर्श मानतो.
गोविंदाला आत्तापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी 12 वेळेस नामांकन मिळालं आहे.
गोविंदाने 1986 मध्ये 'इल्जाम' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 165 चित्रपट केले आहेत.
गोविंदा आपल्या सहा भावंडांपैकी सर्वात लहान असल्याने त्याला घरात प्रेमाने ची ची म्हणतात.
अभिनेता अरुण कुमार अहूजा आणि निर्मला अहूजा असं गोविंदाच्या आई वडिलांचं नाव आहे. गोविंदाची आई निर्मला आहूजा या अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यामुळे गोविंदाला घरातूनच अॅक्टिंगचे धडे मिळाले.
बालिवूडचा हिरो नंबर वन आणि कॉमेडी किंग गोविंदा 55 वर्षांचा झाला आहे. 21 डिसेंबर 1963 साली त्याचा जन्म झाला होता. गोविंदाने त्याचा 55वा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -