मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडीया यांचं शनिवारी मुंबईत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. बेट्टी कपाडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री ट्विंकल खन्नाची आजी आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांची आई बेट्टी कपाडिया यांनी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.


अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा यांच्यासोबत बेट्टी कपाडिया एका मल्टीप्लेक्स बाहेर दिसून आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना हिंदूजा हॉस्पिटलच्या बाहेर इतर नातेवाईकांसोबत स्पॉट झाले होते. त्यामुळे डिंपल कपाडिया हॉस्पिटलमध्ये असल्याच्या अफवांनी जोर धरला होता. त्यानंतर स्वतः डिंपल कपाडिया यांनी बेट्टी कपाडीया आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले होते.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेट्टी यांनी आपला 80वा वाढदिवस साजरा केला होता. याचे फोटो सोशल मीडियावर दिसून आले होतं. यानिमित्ताने त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. ट्विंकल खन्नाने आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत आजीच्या वाढदिवसासंबंधातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.


या पोस्टमार्फत ट्विंकल खन्नाने आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या आनंदासाठी प्रार्थना केली होती. या फोटोमध्ये ट्विंकलचा मुलगा आरव, मुलगी नितारा आणि आई डिंपल कपाडियाही दिसून येत आहे. तसेच या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये अक्षय कुमार आणि बेट्टी कपाडीया यांचाही एक फोटो पाहायला मिळेल.