DeepVeerReception : आंखोंमें बसे हो तुम...
रिसेप्शनपूर्वी दोघांनी रॉयल पोझमध्ये फोटोसेशन करत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिकाला आपल्या साडीचा लांबलचक पदर सांभाळता येईना, तेव्हा रणवीरने तिला मदत केली, या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ लागलीच सोशल मीडियावर व्हायरल झाले.
अंगडिया गॅलरीची साडी दीपिकाने नेसली होती, तर रणवीरने रोहित बालने डिझाईन केलेला शेरवानी परिधान केला होता.
गळ्यात हेवी स्टोन नेकलेस, इअररिंग्स, हातात लाल चुडा, सिंदूर, भरपूर गजरे अशा वेशात नववधू दीपिका दिसली.
मित्र आणि नातेवाईकांसाठी बंगळुरुत रिसेप्शन आयोजित करण्यात आलं असून मुंबईत सेलिब्रेटींसाठी 28 तारखेला रिसेप्शन होणार आहे.
बॉलिवूडचं 'ट्रेण्डिंग' कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचं रिसेप्शन बंगळुरुमध्ये झालं.
इटलीमध्ये सिंधी आणि कोंकणी पद्धतीने रणवीर-दीपिका गेल्या आठवड्यात विवाहबंधनात अडकले. लेक कोमोच्या किनारी विला देल बलबियानेलोमध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली.
नववधू दीपिकाचं सौंदर्य पाहून उपस्थित तर थक्क झालेच, पण नवरदेव रणवीरची नजर तिच्यावर दूर होत नव्हती. स्टेजवर येतानाही दोघं हातात हात घालून आले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -