मुंबई : आपल्या उंचीप्रमाणे सिनेमसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर टॉपवर पोहोचलेली बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुपरस्टार शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका आज स्वत: एक सुपरस्टार अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. दीपिकाने शाहरुखसोबत 'ओम शांती ओम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. लोकांच्या कायम स्वरुपी लक्षात राहतील अशा अनेक भूमिका दीपिकाने साकारल्या. अशाही काही भूमिका होत्या की ज्या तिच्यासाठी बनल्या होत्या, मात्र ती त्या निभावू शकली नाही.
दीपिका रणबीर कपूरसोबत 'सांवरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र संजय लीला भंसाळी यांनी सांवरिया सिनेमात रणबीरसोबत सोनम कपूरला कास्ट केलं. या सिनेमातून रणबीर आणि सोनमची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. त्यानंतर संजल लीला भंसाळी यांनी दीपिकासोबत तीन सिनेमे केले आणि तिन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. या सिनेमांमुळे दीपिकाची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली.
यशराजच्या दोन सिनेमांमध्ये दीपिकाऐवजी कतरिनाला संधी
यश चोप्रा यांच्या शेवटच्या 'जब तक है जान' या सिनेमात आधी दीपिका झळकणार होती. मात्र ऐनवेळी दीपिकाऐवजी कतरिना कैफला संधी देण्यात आली. त्यानंतर यशराज प्रोडक्शनचा सुपरहिट सिनेमा धूम-3 मध्येही दीपिका भूमिका साकारणार होती, मात्र तेथेही दीपिकाला कतरिनाने रिप्लेस केलं. आमिर खान स्टारर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.
'या' रोलमुळे दीपिका बनली टॉपची अभिनेत्री
शांतीप्रिया/सँडी (ओम शांती ओम) (2007)
मीरा पंडीत (लव्ह आज कल) (2009)
वेरोनिका मलानी (कॉकटेल) (2012)
मीनालोचनी अजगुसुन्दरम (चेन्नई एक्स्प्रेस) (2013)
लीला सनेडा (गोलियों की रासलीला राम-लीला) (2013)
अलीना मलिक (रेस 2) (2013)
मस्तानी (बाजीराव मस्तानी) (2015)
पीकू बॅनर्जी (पीकू) (2015)
तारा माहेश्वरी (तमाशा) (2015)
रानी पद्मावती (पद्मावत) (2018)
दीपिकाने अनुपम खेर यांच्या स्कूल ऑफ अॅक्टिंगमधून अभिनयाचे धडे गिरवले. तर श्यामक डावर यांच्या डान्सचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 2007 मध्ये हिमेश रेशमियाच्या म्युझिक व्हिडीओ 'नाम हे तेरा'मध्ये झळकली होती. शाहरुख आणि फराह खान यांनी याच व्हिडीओत दीपिकाला पाहून 'ओम शांती ओम'साठी साईन केलं होतं. काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल-11 कार्यक्रमामध्ये दीपिकाने हिमेश रेशमियाचे आभार मानले होते.