Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
न्यू इयरला 'या' 6 सेलिब्रेटींचं बर्थडे सेलिब्रेशन
1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. मात्र याच दिवशी बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रेटी आपला वाढदिवसही साजरा करतात. त्यामुळे 31 डिसेंबरला सुरु झालेलं पार्टी सेलिब्रेशन दोन दिवस सुरु राहणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशपाल शर्मा : अभिनेते यशपाल शर्मा यांचा जन्म 1 जानेवारी 1967 रोजी झाला. गंगाजल, लगान, अब तक छप्पन या चित्रपटात यशपाल यांनी भूमिका केल्या आहेत.
विद्या बालन : बॉलिवूडची 'उलाला गर्ल' विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 चा. हम पाच मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. परीणिता चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. डर्टी पिक्चर, पा, कहानी, इश्किया असे विद्याचे अनेक सिनेमा गाजले. नुकत्याच आलेल्या 'तुम्हारी सुलू' चित्रपटातही तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला.
सोनाली बेंद्रे : अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी झाला. आग चित्रपटातून 19 व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दिलजले, टक्कर, भाई, ड्युप्लिकेट, सरफरोश, हम साथ साथ है यासारख्या चित्रपटांमुळे सोनाली बेंद्रे प्रेक्षकांच्या मनात ठसली. अनाहत चित्रपटाच्या निमित्ताने ती मराठीत झळकली, तर 'अगंबाई अरेच्चा!'मध्ये 'छम छम...' या एका गाण्यात तिने ठेका धरला. 2002 मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच राहिली आहे.
सयाली भगत : 2004 मध्ये मिस इंडिया झालेली सयाली भगत आजच केक कापते. तिचा जन्म 1 जानेवारी 1984 चा. जेल, यारिया, द ट्रेन यासारख्या चित्रपटांमध्ये सयाली झळकली होती.
नाना पाटेकर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगडमधील मुरुड जंजिरात झाला. नानांच्या क्रांतिवीर, प्रतिघात, परिंदा, प्रहार, अंकुश अशा अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या. त्यांच्या ब्लफमास्टर, वेलकम, टॅक्सी नंबर 9211 अशा चित्रपटातील हलक्याफुलक्या भूमिकांनीही प्रेक्षकांवर छाप पाडली. सिंहासन, माफीचा साक्षीदार पासून पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट अशा मराठी चित्रपटातील व्यक्तिरेखाही वाहवा मिळवून गेल्या.
असरानी : प्रख्यात अभिनेते असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 चा.. त्यांचं मूळ नाव गोवर्धन असरानी. असरानी 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये झळकले आहेत. 'शोले'मध्ये त्यांचा अंग्रेजोके जमाने का जेलर चांगलाच गाजला. त्यांनी मुख्यत्वे विनोदी भूमिका साकारल्या. धमाल, बोल बच्चन, दे दनादन, खट्टा मिठा, ऑल द बेस्ट हे अलिकडच्या काळात
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -