दोन दिवसात 'शिवाय', 'ऐ दिल..'मध्ये कुणाची बाजी?
2011 ते 2015 पर्यंत दिवाळीला रिलीज झालेल्या सिनेमांनी आतापर्यंत 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यावर्षीही असाच ट्रेंड कायम राहिला तर दोन्हीही सिनेमे 100 कोटींची कमाई करु शकतात.
सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये 'शिवाय'चाच दबदबा दिसत आहे. कारण 'शिवाय'ने सिंगल स्क्रीनवर चांगली कमाई केली आहे.
दोन्ही सिनेमांच्या कमाईमध्ये आतापर्यंत जवळपास 6 कोटी रुपयांचं अंतर आहे.
'शिवाय'ने पहिल्या दिवशी 10.24 कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशी केवळ 10.6 कोटींचाच गल्ला जमवला. 'शिवाय'ने आतापर्यंत एकूण 20.30 कोटींची कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी 'ऐ दिल है मुश्किल'ने 13.30 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 13.10 कोटी रुपये जमवले. सिनेमाने एकूण 26.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.
बॉक्स ऑफिसवर अजय देवगनचा 'शिवाय' आणि करण जोहर दिग्दर्शिक 'ऐ दिल है मुश्किल' या दोन्ही सिनेमांना सरासरी ओपनिंग मिळाली आहे. मात्र यामध्ये आतापर्यंत 'ऐ दिल है मुश्किल'नेच बाजी मारल्याचं चित्र आहे.