2018 मध्ये आई-बाबा झालेले दहा बॉलिवूड सेलिब्रेटी
नेहा धुपिया : अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी याच वर्षी मे महिन्यात विवाहबंधनात अडकले. नेहाने नोव्हेंबरमध्ये मेहरला जन्म दिला. त्याचवेळी आपण लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याचा खुलासा तिने केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउदिता गोस्वामी : पाप, झहर यासारख्या चित्रपटातून गाजलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली. 21 नोव्हेंबरला तिने 'कर्म' या मुलाला जन्म दिला. तिचा पती मोहित सुरी प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.
सनी लिओन : मार्च महिन्यात सनी लिओन दोन मुलांची आई झाली. अॅशर सिंग वेबर, नोआ सिंग वेबर अशी मुलांची नावं आहेत. यापूर्वी तिने निशाला दत्तक घेतलं होतं.
सुनिधी चौहान : सुनिधीला 1 जानेवारी 2018 रोजी मुलगा झाला. सुनिधीने संगीतकार हितेश सोनिकशी लग्न केलं आहे.
श्रेयस तळपदे : अभिनेता श्रेयस तळपदे 4 मे रोजी सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला. 14 वर्षांपूर्वी श्रेयस आणि दीप्ती विवाहबंधनात अडकले होते.
शाहीद कपूर : अभिनेता शाहीद कपूर 5 सप्टेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला. शाहीदने आपल्या बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं
रंभा : 40 व्या वर्षी अभिनेत्री रंभा तिसऱ्यांदा आई झाली. कॅनडामध्ये 23 सप्टेंबरला रंभाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
नील नितीन मुकेश : अभिनेता नील आणि रुक्मिणी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उदयपूरमध्ये लग्न केलं होतं. 20 सप्टेंबरला त्यांची कन्या नुर्वीचा जन्म झाला
लिसा रे : मॉडेल आणि अभिनेत्री लिसा रे आई झाली. सरोगसीद्वारे तिने जून महिन्यात जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींचा जन्म जॉर्जियामध्ये झाला. सुफी आणि सोलिएल अशी दोन्ही मुलींची नावं आहेत.
गुल पनाग : अभिनेत्री गुल पनागने फेब्रुवारी महिन्यात निहालला जन्म दिला. मात्र सहा महिने तिने ही गोष्ट लपवून ठेवली होती. आपलं वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठी तिने ही गोष्ट जगजाहीर केली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -