हे अभिनेते बॉलिवूडमध्ये कधी आले, कधी गेले?
झायेद खान - संजय खानचा मुलगा. चुरा लिया है तुमने सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, मात्र झायेदनेही फारशी चमक दाखवलेली नाही
उदय चोप्रा - यश चोप्रा यांचा मुलगा, आदित्य चोप्राचा भाऊ. चोप्रा कॅम्पच्या बाहेर मात्र त्याच्या वाट्याला फारसे सिनेमे आले नाहीत
तुषार कपूर- जितेंद्र यांचा मुलगा, तर एकता कपूरचा भाऊ. इतरांच्या तुलनेत तुषार कपूरने बऱ्यापैकी जम बसवला. मुझे कुछ कहना है सिनेमातून करिना कपूरसोबत सिनेविश्वात आला. मात्र त्याच्या वाट्याला गोलमाल व्यक्तिरिक्त फारसं यश आलं नाही
सिकंदर खेर - अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा. वुडस्टॉक विला सिनेमातून हा बॉलिवूडमध्ये आला, मात्र प्रतिभावान आई-वडिलांचा वारसा तो काही पुढे चालवू शकला नाही.
रुसलान मुमताझ - गोड चेहऱ्याचा हा अभिनेता एमपी3 नावाच्या चित्रपटातून सिनेविश्वात आला. मात्र त्याच्याप्रमाणेच त्याचे सिनेमेही कधी आले नि कधी गेले, हे कोणालाच कळलं नाही
महाअक्षय चक्रवर्ती - मिथुन चक्रवर्तींचा मुलगा. 2008 मध्ये जिमी सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याचा शेवटचा सिनेमा आला तीन वर्षांपूर्वी. मात्र तो चर्चेत राहिला एका अभिनेत्रीने केलेल्या बलात्कारांच्या आरोपांमुळेच
हर्मन बावेजा- निर्माते हॅरी बावेजा यांचा पुत्र. लव्ह स्टोरी 2050 मधून त्याने बॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या अपोझिट एन्ट्री केली. त्यावेळी प्रियांकासोबत त्याच्या अफेअरची चर्चाही झाली. मात्र त्याने केलेले मोजून पाच चित्रपटही कोणाला सांगता येणार नाहीत.
फरदीन खान - संजय खान यांचा पुत्र. प्रेम अगन सिनेमातून त्याने बॉलिवडमध्ये पाऊल ठेवलं. त्याचा एकही सोलो हिट प्रेक्षकांच्या लक्षात नाही, 2010 नंतर तो मोठ्या पडद्यावर झळकला नाही. काही महिन्यांपूर्वी जाडजूड फरदीन पाहून प्रेक्षक अवाक झाले
अष्मित पटेल - अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ ही त्याची ओळख. पण अमिषाही आता अनेकांच्या स्मृतीत नाही. मल्लिका शेरावतसोबत मर्डरमध्ये अष्मित झळकला. बिग बॉस, जय हो चा अपवाद वगळता त्याचं दर्शन घडलेलं नाही
अध्ययन सुमन - शेखर सुमनचा मुलगा अध्ययनने हाल-ए-दिल नावाच्या सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर राझ 2 शिवाय त्याच्या कुठल्याच सिनेमाची चर्चा झाली नाही. केवळ कंगनाच्या आरोपांमुळे विस्मरणात गेलेला अध्ययन अनेकांना पुन्हा आठवला