वीकेंडला 'बेफिक्रे'ची दमदार कमाई
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2016 05:32 PM (IST)
1
अभिनेता रणवीर सिंह आणि वाणी कपूर स्टारर 'बेफिक्रे' सिनेमाने वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 10 कोटी 36 लाख, दुसऱ्या दिवशी 11 कोटी 60 लाख आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.
2
9 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला.
3
यशराज बॅनरच्या या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केलं असून हा सिनेमा देशभरात 2100 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.
4
'koimoi' या वेबसाईटच्या आकड्यांनुसार या सिनेमाने भारत आणि वर्ल्डवाईड अशी मिळून एकूण 47 कोटी 88 लाख रुपये कमाई केली आहे.
5
बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला नोटाबंदीचा कसलाही फटका बसल्याचं चित्र नाही. भारतासोबत 'बेफिक्रे'ने वर्ल्डवाईडही चांगली कमाई केली आहे.
6
यासोबतच या सिनेमाने वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 34 कोटी 36 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.