काय आहे अनुष्काचं स्वप्न?
अनुष्काने २००८ मध्ये शाहरुख खानच्या 'रब ने बना दि जोडी' या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१४ मध्ये तिने आमिर खानसोबत 'पीके' या चित्रपटात काम केले. आता ती बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत 'सुलतान' या चित्रपटात दिसणार आहे.
२८ वर्षीय अनुष्काला चित्रपटसाठी कधीही अभिनेत्यांची निवड करण्याची गरज भासली नाही. केवळ दिग्दर्शक आणि स्क्रिन प्लेचाच तिला विचार करावा लागल्याचे ती सांगते.
एक अभिनेत्री म्हणून या तीन खानांसोबत काम करताना तिला भरपूर अनुभव मिळाला. या तिघांकडेही चित्रपट उद्योगाबद्दल दोन दशकाहून आधिक काळचा अनुभव आहे. त्यामुळे यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. यांच्यासोबत काम करताना तिचे काम प्रेक्षकांपर्यंत पोहचले, याबद्दल तिने तिन्ही खानांचे आभार मानले आहेत.
तिच्या आगामी 'सुलतान' या चित्रपटात ती हरयाणाच्या एका कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास यांनी केले आहे.
बॉलीवूडमध्ये सलमान, आमिर, आणि शाहरुख यांच्यासोबत काम करण्याचे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. या तीन खानासोबत फिल्म केलेल्या अगुष्का शर्माचे स्वप्न काय आहे, याची तुम्हालाही उत्सुकता असेल.