अभिनेता अनिकेत विश्वासरावचा साखरपुडा

मराठी मनोरंजन विश्वातील 'चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

अनिकेत आणि स्नेहा चव्हाण आगामी 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती.
पुण्यातील हिंजवडीमध्ये रविवारी पाच ऑगस्टला स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झाला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं.
दोघांनी साखरपुडा लगोलग केला असला, तरी बोहल्यावर चढण्याची त्यांना घाई नाही. तूर्तास करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा दोघांचा इरादा आहे.
अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत अनिकेतचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे.
अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अनिकेत विश्वासरावने 'अल्फा मराठी' वाहिनीवरील 'नायक' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'झी मराठी'वरील 'ऊनपाऊस' मालिकेत त्याने साकारलेली सागरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच अनिकेत अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -