The Bhootnii Review: हॉरर कॉमेडीचा तडका, वन टाईम वॉच; टाईमपाससाठी 'भूतनी' पाहाच!
The Bhootnii Movie Review: काही फिल्म्स फक्त टाईमपाससाठी असतात, वन टाईम वॉच असतात. फक्त पाहून हसायचं असतं, अशा फिल्म पाहून आपण एंटरटेन होतो आणि रिलॅक्स होऊन थिएटरबाहेर येतो, अशीच फिल्म आहे, 'भूतनी'.
Siddhant Kumar Sachdev
Sanjay Dutt, Maanayata Dutt, Deepak Mukut, Hunar Mukut
Theaters
The Bhootnii Movie Review: सध्या प्रेक्षकांमध्ये हॉरर कॉमेडीचा ट्रेंड सुरू आहे, स्त्री आणि मुंज्या सारख्या फिल्म्स हिट झाल्यानंतर हॉरर कॉमेडी फिल्म्स बनवण्याचा ट्रेंडही आलाय. अशीच एक फिल्म नुकतीच रिलीज झालीय, 'भूतनी'. हा 'स्त्री'सारखा तर नाही, पण ठिक ठाक टाईमपास एंटरटेनर आहे, काही फिल्म्स फक्त टाईमपाससाठी असतात, फक्त आणि फक्त वन टाईम वॉच असतात. फक्त पाहून हसायचं असतं, अशा फिल्म पाहून आपण एंटरटेन होतो आणि रिलॅक्स होऊन थिएटरबाहेर येतो, अशीच फिल्म आहे, 'भूतनी'.
'भूतनी'ची कथा...
एक कॉलेज आहे, जिथे व्हर्जिन ट्री नावाचं एक झाड आहे, या झाडाचं एक रहस्य आहे, होळीच्या सुमारास या कॉलेजमध्ये काहीतरी विचित्र घडतं, काही विद्यार्थी आत्महत्या करतात, मग कॉलेजमध्ये भूत आहे का? कॉलेज मॅनेजमेंट यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही, म्हणून मॉडर्न तांत्रिक संजय दत्तला बोलावलं जातं, एक 'भूतनी' सनी सिंहच्या मागे लागू लागते, तिचं रहस्य काय आहे, हे तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल.
चित्रपट कसा आहे?
'भूतनी' चित्रपट मेंदू फ्रीजमध्ये ठेवून पाहावा असा आहे, तुम्ही मध्येच हसाल, मनोरंजन होईल, हा चित्रपट महान नाही पण वाईटही नाही, कॉमिक पंच चांगले आहेत, माझ्यासोबत चित्रपट पाहणारे लोक खूप हसत होते, या चित्रपटाचं जास्त प्रमोशन करण्यात आलेलं नाही, किंवा त्याला जास्त स्क्रीन्हीस मिळालेल्या नाहीत, त्यामुळे चित्रपटाकडून फारशा अपेक्षाही नाहीत, पण या चित्रपटाला खूप फायदा होणार आहे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता, तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. इंटरवलनंतरचा चित्रपट फार ओढलेला-ताणलेला जाणवतो. जर चित्रपट आणखी लहान असता, तर तो अधिक चांगला दिसला असता. सनी सिंह, निकुंज शर्मा आणि आसिफ खानची केमिस्ट्री खूप चांगली आहे, संजय दत्त चित्रपटात जीव टाकतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीत जर तुम्हाला हा चित्रपट तुम्ही टाईमपास म्हणून पाहू शकता.
सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाबाबत थोडंस...
'भूतनी'मध्ये संजय दत्तचं काम खूप चांगलं आहे, त्याला पाहणं मजेशीर आहे, त्यानं अशी भूमिका यापूर्वी कधीही केलेली नाही, म्हणूनच तो आणखी उठून दिसतो. संजय दत्तनं विनोदाचं जे टायमिंग पकडलंय, ते फारच सुरेख आहे. फिल्ममध्ये त्यानं दिलेल्या कॉमिक पंच फेकतो, सनी सिंहनं त्याची भूमिका परिपूर्णतेनं साकारली आहे, त्याला पाहून तुम्हाला दया येते आणि हसूही येतं, आसिफ खान खूप प्रभावित करतो, त्याच्या कॉमिक पंचांवर खूप शिट्ट्या येतात. त्यांनी हे पात्र वेगवेगळ्या पद्धतीनं साकारलं आहे आणि त्याला पूर्ण न्याय दिला आहे, मौनी रॉयही चांगली दिसली आहे, पलक तिवारी, निकुंज शर्मानं उत्तम काम केलंय.
दिग्दर्शन आणि लेखन...
सिद्धांत सचदेवनं 'भूतनी' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे, जर पटकथा चांगली असती तर ती अधिक आनंददायी झाली असती, दुसरा पार्ट लहान करता आला असता.























