मंडला मर्डर्स (Mandala Murders) सिरीजचा प्लॉट नेमका कसा?

कथेचं केंद्रस्थान आहे ‘चरंदासपूर’नावाचं उत्तर प्रदेशमधील एक गूढ आणि रहस्यमय गाव. या गावच्या वेशीवर एक घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या मधोमध एक अघोरी दैवी आणि वैज्ञानिक विचारांच्या सुशिक्षित महिलांचाएक गुप्त संप्रदाय ‘Aayastis’ चं एक स्थान पाहायला मिळते,  या Aayastis ज्यांचं उद्दिष्ट आहे त्यांचा एक मृत देव “Yast”ला पुन्हा जिवंत करण… यस्तचं पुनरुत्थान घडवणं. या सगळ्यामागे असतात श्रद्धा, हत्या, शरीराचे तुकडे, वरदान आणि त्या बदल्यातल बलिदान…  एकामागून एक भयानक खून घडू लागतात, खुनांचा सिक्वेन्स एका मंडल मधे दडलेला असतोया प्रकरणाची चौकशी करायला येते CBI ऑफिसर Rea Thomas (वाणी कपूर) जी आपल्या भूतकाळाशी जोडलेली आहे. तिला वेगवेगळे भास होताना पाहायला मिळतात. Rea ला साथ देतो एक खटला उघड करणारा दिल्लीचा पोलिस विक्रम सिंग. (Vaibhav Raj Gupta) दोघं मिळून या हत्याकांड, पुरातन संप्रदाय आणि अंधश्रद्धेचं गूढ उलगडायला निघतात पण गोष्ट इतकी सोपी नाही! बरेच ट्विस्ट आहेत गोष्टी मागे  गोष्ट दडलेली आहे ते सगळ या सिरीजमध्ये दडलेलं आहे…

का पाहावी सिरीज?

  • गूढ जग :अंधारलेलं गाव, रहस्यमय खून, आणि पुराण कथांवर आधारित सिरीजचा प्लॉट!
  • वाणी कपूरचा दमदार परफॉर्मन्स
  • थरारक इन्वेस्टिगेशन्स आणि ट्विस्ट्स: कथा जसजशी पुढे जाते, तशी रहस्यं वाढतात उलघडतात…
  • दृश्यरचना, पार्श्वसंगीत,गावाचं वातावरण, पुरातन चिन्हं, आणि एकंदरीत आर्ट डिपार्टमेंटच प्रभावी काम 
  • यशराज फिल्म्सची the railway men नंतरची दुसरी पैसा ओतलेली सिरीज 

काय कमी?

  • स्लो इन फास्ट आऊट, सिरीजची सुरुवात प्रचंड कंटाळवाणी आहे पाहिले तीन ते चार एपिसोड पाहिल्यानंतर तुमचा इंटरेस्ट वाढेल.
  • लेखक दिग्दर्शक गोपी पूथन साहेब सिरीजच्या गूढ पुराणातच एवढे रमलेत की रियल टाईम मधील ड्रामा नाटकी वाटतो कथेचे गांभीर्य ठराविक कलाकारांच्या अभिनयात दिसत काहींच्या नाही.
  • जास्त संवाद आणि तीच ती स्पष्टीकरणं 
  • शेवटच्या दोन एपिसोडमध्ये घिसाड घाई करून उलघडून फटाफट सांगितलेली स्टोरी 

मंडला मर्डर्स पाहावी का नाही?

जर तुम्हाला गूढ कथेवर आधारित थ्रिलर, आणि सस्पेन्स आवडत असेल आणि वेळ घालवण्यासाठी दुसर काही नसेल तर जास्त जजमेंटल न होता Mandala Murders पाहू शकता ही सिरीज मानवी मानसशास्त्र, श्रद्धा, धर्म, आणि सत्य यामधील धूसर रेषा दाखवते सोबतच तुमच्या बुद्धीला चावी सुद्धा देते, विचार करायला लावते…

आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो महागुरू सचिन पिळगावकरांच्या लेक श्रेयाचं…  वाणी कपूर पेक्षा दमदार अभिनय केलाय, पात्र छोट होत पण लक्षात राहील…. दिग्दर्शक कलाकारांच्या निवडीत सपशेल आपटलेत, वातावरण निर्मितीचं गंडल्याने पुढे रंजकता उरत नाही सुरुवात थोडी संथ वाटू शकते, पण सस्पेन्स आणि गूढतेमुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कारण तुमच्याकडे दुसरे काही पाहायला नसेल तर. आणि हो दिग्दर्शकाला सिरीजच्या कथेनुसार वरदान मिळाले पुन्हा सिरीज बनवायची तर बऱ्याच चुका सुधारता येतील… पण दिग्दर्शकाची बलिदानाची तयारी आहे का पहाव लागेल…

मी मंडला मर्डर्स या सिरीजला देतोय फक्त 2.5 स्टार!

 F1 चा थरार आता iPhone वर! ॲपलने आणला हॅप्टिक ट्रेलर, अनुभवा रेसिंगचा रोमांचक अनुभव!