Jana Nayagan Movie Review: जर तुम्हाला खरी हिरोगिरी काय असते, हे पाहायचं असेल तर, ही फिल्म तुम्ही खरंच पाहिली पाहिजे. फिल्मचं नाव आहे, Jan Neta... तमिळमध्ये ही फिल्म Jana Nayagan नावानं रिलीज केली जाणार आहे. ही फिल्म थलपती विजय (Thalapathy Vijay) याची शेवटची फिल्म असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यामुळेच ही फिल्म त्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी पर्वणी ठरणार आहे. साऊथ सिनेमांमध्ये जी हिरोगिरी दाखवली जाते, त्याचं कमालीचं वर्जन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. फिल्ममध्ये Vijay ला सारखं-सारखं 'थलपती' म्हणून दाखवलं जातं. महत्त्वाचं म्हणजे, विजयचाही तोच अंदाज इथे पाहायला मिळतो, ज्यासाठी तो ओळखला जातो. ही फिल्म आधी रिलीज होणार होती, पण सेंसॉरमुळे अडकलेली. अखेर आता हा सिनेमा रिलीज झालाय. फक्त आता जरा चित्र वेगळं आहे, आता या सिनेमाचा हिरो, तामिळनाडूचा मुख्यमंत्री झालाय आणि सिनेमातही त्याचं इंट्रोडक्शन काहीसं असंच दिलं गेलंय. या फिल्मची सर्वात मोठी आणि जवळपास एकमेव वैशिष्ट्य Thalapathy Vijay हेच आहे. 

Continues below advertisement

विजय थलपतीचा सिनेमा नेमका कसा आहे? 

फिल्मची कहाणी Thalapathy Vetri Kondan नावाच्या एका व्यक्तीची आहे, जी जेलमध्ये बंद असते. जेलमध्ये तिची मैत्री एका पोलीस अधिकाऱ्यासोबत होते. एका दुर्घटनेत त्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू होतो. ज्यानंतर थलपती त्याच्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतो. ती मुलगी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. दरम्यान, देशाचे काही शत्रू भारताच्या विरोधात एक मोठं कारस्थान रचतात. थलपती त्यांना कसं रोखतो, या प्रकरणाशी त्यांच्या मुलीचा काय संबंध आहे? ते तुरुंगात का होते? आणि त्यांची पार्श्वभूमी काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. हा सिनेमा जरी तेलगू फिल्म भगवंत केसरीपासून (Bhagavanth Kesari) प्रेरित असला, तरी विजयनं आपल्या स्टारडम, स्टाईल आणि हिरोगिरीच्या जोरावर यात अशी ऊर्जा भरली आहे की, तुम्हाला संपूर्ण सिनेमाचा आनंद घेता येईल. हा एक परिपूर्ण 'मनोरंजनाचा मसाला' असलेला सिनेमा आहे, जो विशेषतः थलपती विजयचे चाहते थिएटरमध्ये अनेकदा पाहणं पसंत करतील.

Continues below advertisement

थलपती विजयचा हा सिनेमा जवळपास तीन तासांचा आहे, त्यामुळे पाहताना काही ठिकाणी सिनेमा कंटाळवाणा वाटतो खरा, पण अजिबातच विसरायचं नाही की, यामध्ये सुपरस्टार थलपती विजय आहे, तो स्क्रिनवर येताच धुरळा उडवून देतो. फिल्मचे अॅक्शन सीक्वेन्स शानदार आहेत आणि अगदीच रॉ अंदाजात शूट करण्यात आलेत. विजय आणि बॉबी देओल यांच्यातले सीन्स फिल्मच्या सर्वात मोठ्या हायलाइट्सपैकी एक आहेत. पोलिसांच्या वर्दीमध्ये विजयचा लूक फारच भारी आहे. फिल्म भारताच्या लोकशाहीला खूप उत्तम पद्धतीनं सेलिब्रेट करते, भारत-पाकिस्तानचा अँगल आहेत, पण संपूर्ण फिल्म त्यावरच आधारित नाही, ब्रँकग्राउंड म्युझिक दमदार आहे, गाणी खूपच चांगली आहेत आणि विजयचा डान्स तर नेहमीप्रमाणेच पाहण्यासारखा आहे, जर तुम्ही विजयचे फॅन असाल तर, फिल्ममध्ये खूप सीन्स असे येतील, जे तुम्हाला टाळ्या आणि शिट्या वाजवायला भाग पाडतील. 

विजय थलपतीचा अभिनय 

थलपती विजयनं अप्रतिम काम केलंय. त्याला पडद्यावर पाहताना तो 52 वर्षांचा आहे, असं अजिबात वाटत नाही, तो अत्यंत टवटवीत आणि उत्साही दिसतो, विशेषतः जेव्हा तो तरुण अवतारात दिसतो. त्याचा स्वॅग, ॲक्शन सीन्स आणि पडद्यावरील त्याचा प्रेजेन्स यामुळे संपूर्ण सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो. 

सिनेमाची कथा जरी अगदी साधी असली, तरी विजयनं आपल्या अभिनयानं आणि 'स्टार पॉवर'नं तिला अधिक प्रभावी बनवलंय, हेच एका खऱ्या सुपरस्टारचं लक्षण आहे. बॉबी देओलनंही उत्कृष्ट अभिनय केला आहे, त्याचं पात्र केवळ एक साचेबद्ध खलनायक नाही, कारण त्याच्या पात्राची पार्श्वभूमीही यात मांडली गेली आहे. हे पात्र अतिशय समर्थपणे साकारलं गेलं असून, बॉबी देओलनं आपल्या अभिनयानं त्यात जीव ओतला आहे. पूजा हेगडेची (Pooja Hegde) भूमिका छोटी असली तरी ती आपला प्रभाव पाडते. 'विजी'च्या भूमिकेत ममिता बैजू खूप छान दिसते आणि तिनं आपल्या अभिनयातून निरागसता आणि भावनिक खोली अशा दोन्ही गोष्टी उत्तमरीत्या साकारल्या आहेत. प्रकाश राज (Prakash Raj) नेहमीप्रमाणेच प्रभावी वाटतो, मात्र त्याच्या पात्राला पडद्यावर थोडा अधिक वेळ मिळायला हवा होता. प्रियामणीनं (Priyamani) छोटी पण प्रभावी भूमिका साकारली आहे आणि नास्सारनेही (Nassar) आपली छाप पाडली आहे.

Jana Nayagan  सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन 

Jana Nayagan सिनेमाची कहाणी Anil Ravipudi यांनी लिहिलीय आणि दिग्दर्शन  H. Vinoth यांनी केलंय. स्क्रिनप्लेसुद्धा H. Vinoth यांनीच केलंय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, H. Vinoth यांनी Thalapathy Vijay ला चाहत्यांना ज्या अंदाजात पाहायचं होतं, त्याच अंदाजात सादर केलंय. त्याची कहाणी जरी नवी वाटली, पण सादरीकरण आणि स्टार ट्रिटमेंट याला आणखी मनोरंजक बनवते. 

जर तुम्ही Thalapathy Vijay चे चाहते असात, तर ही फिल्म कोणत्याही परिस्थितीत थिएटरमध्येच पाहा... 

रेटिंग : 3 स्टार्स