Hai Jawani To Ishq Hona Hai Film Review: डेव्हिड धवनच्या (David Dhavan) सिनेमांत एक विशेष शैली पाहायला मिळते.  त्यांच्या सिनेमाच्या (Entertainment) शैलीच्या चौकटीत कॉमेडीही असते, इमोशनल (Film Review) करणारे सीन्सही असतात.  त्यांच्या जुन्या खास अंदाजाला डेव्हिड धवनने अपग्रेड केलं आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि वरुण अभिनीत 'है जवानी तो इश्क होना है' हा सिनेमा 5 जून रोजी रिलीज झाला आहे. बाप - लेक या जोडीचा हा सिनेमा पाहून तुम्हाला डोकं बाजूला ठेवून, 2 तास केवळ मनोरंजनाचा आनंद घ्यावासा वाटेल. 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमातून डेव्हिड धवनची तीच कॉमेडी, रोमान्स अन्  ड्रामाची स्टाईल पाहायला मिळेल. 'है जवानी तो इश्क होना है' हा सिनेमा नेमका आहे तरी कसा?  जाणून घेऊयात.

या सिनेमाच्या स्टोरीतून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार? (Hai Jawani To Ishq Hona Hai movie review)

जस आणि बानी म्हणजेच वरुण आणि मृणाल, या सिनेमाची कथा  या जोडप्याभोवती फिरते.  जसला मूल हवे असते, तर बानीला घटस्फोट हवा असतो.  त्यांचे हे प्रकरण कोर्टापर्यंत जाते, दोघेही वेगळे होतात, पण घटस्फोट होत नाही.  यानंतर जसची भेट प्रीतशी होते. प्रीत म्हणजे पूजा हेगडे. प्रीतचा भाऊ जिमी शेरगिल हा पोलीस असतो. नंतर असं काही घडतं की,  बानी आणि प्रीत दोघेही गरोदर राहतात. नंतर नेमकं काय घडतं? हे आपल्याला सिनेमातून पाहायला मिळेल.

'है जवानी तो इश्क होना है' हा सिनेमा आहे तरी कसा? (Hai Jawani To Ishq Hona Hai rating and story)

डेव्हिड धवन यांचा सिनेमा म्हणजे, डोकं न लावता  केवळ 2 तास फ्रि बसून सिनेमा एन्जॉय करणे.     या सिनेमात उत्तम कॉमेडी, लंडनमधील जबरदस्त लोकेशन आणि कलाकारांची उत्कृष्ट अॅक्टिंग  सादर करण्यात आली आहे. 2 तास 10 मिनिटं हा सिनेमा शेवटपर्यंत कंटाळवाणा वाटत नाही.  अशा प्रकारचे सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठा असून, 'है जवानी तो इश्क होना है' हा सिनेमाही प्रेक्षकवर्गाला नक्कीच आवडेल. 

या सिनेमाचा टीझर इतका खास नव्हता, परंतु सिनेमाचा ट्रेलर आपल्याला आवडेल. जर आपल्याला सिनेमाचा ट्रेलर आवडला असेल तर,  हा सिनेमाही नक्कीच आवडेल.  हा एक स्नॅकर फिल्म आहे, त्यामुळे या सिनेमातून तुम्हाला नवीन काही पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करु नका.   ही एक टिपिकल डेव्हिड धवन फिल्म आहे. फर्स्ट हाफमध्ये या सिनेमाची स्टोरी बिल्ड होते. सेकेंड हाफमध्ये दोन्ही बायकांमधील गोंधळात टाकणारी दृश्ये खरोखरंच आपल्याला पोट धरुन हसवतात.   

वरुण धवनने या सिनेमात उत्तम काम केलं आहे. यातील त्याचे संवाद मजेशीर आहेत. या सिनेमात वरुण देखणा आणि फिट दिसतो.  मृणाल ठाकूरचे काम ठिकठाक आहे. पूजा हेगडेनं देखील चांगलं काम केलं आहे.  मनीष पॉल यानेही या सिनेमात उत्तम काम केलं आहे.  जिमी शेरगिल यानेही कलाकारांना उत्तम साथ दिली आहे. राकेश कुमार आणि राकेश बेदी यांचं मजेशीर पात्र आहे. मॉनी रॉयचे पात्र शॉकिंग आहे. चंकी पांडे,  आयशा रजा मिश्रा या कलाकारांनीही सिनेमात उत्तम काम केलं आहे.   

'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमाचं लेखन युनूस सजावल यांनी केले असून,  रायटिंग ठिकठाक आहे. आणखी कॉमेडी पंच अॅड करता आले असते. डेव्हिड धवनने या सिनेमाचं उत्तम दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमातून त्यांचं सिग्नेचर स्टाइल दिसून येतं.   डेव्हिड धवन यांच्या चित्रपटांचे तुम्ही फॅन असाल तर, हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल.

रेटिंग - 3.5 स्टार्स

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप