Family Man 3 Review: क्राईम (Crime Series) , सस्पेंस, थ्रिल , ट्विस्ट्स आणि फॅमिली इमोशन्स हे कसं एकाच सीरिजमध्ये अगदी कुशलतेनं मांडता येऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे, 'ही' सीरिज. इथे फक्त हिरोच 'फॅमिली मॅन' (Family Man 3) नाही, तर व्हिलनही 'फॅमिली मॅन' आहे. ही सीरिज म्हणजे, एक उत्तम वेब सीरिज (Web Series) कशी बनवली जाऊ शकते याचं दमदार उदाहरण आहे. जेव्हा उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय एकत्र येतात, तेव्हा थरकाप उडवणारं आणि खिळवून ठेवणारं काहीतरी समोर येतं, ते म्हणजे, 'फॅमिली मॅन 3'.
'फॅमिली मॅन 3' सीरिजची कहाणी काय? (Story Of the 'Family Man 3' Series?)
श्रीकांत तिवारी यावेळी नॉर्थ ईस्टकडच्या मिशनवर जातो, पण असं काहीतरी घडतं, ज्यामुळे त्याला स्वतःलाच वॉन्टेड व्हावं लागतं. आता त्याच्या कुटुंबाचं काय होईल? यावेळी, कथा नॉर्थ ईस्टकडून थेट देशाच्या बाहेरपर्यंत जाते. ही वेब सीरिज Amazon Prime Video वर 45 मिनटांच्या 7 एपिसोडमध्ये पाहू शकता.
कशी आहे वेब सीरिज? (How Is The Web Series?)
ही एक जबरदस्त सीरिज आहे, जी तुम्हाला पहिल्या फ्रेमपासूनच खिळवून ठेवते. यामध्ये फॅमिली सीन्स आहेत. मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत दोघांचा प्रत्येक सीन कमाल आहे. ही सीरिज तुम्ही सुरू केली, तर पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही, हे नक्की. सस्पेंस, थ्रिल आणि ह्यूमरचं असं कमाल कॉम्बिनेशन दिसतं, जे तुम्हाला हादरवून सोडतं. बरं मधेमधे तुम्हाला एवढी सवते की, विचारु नका. ही सीरिज बडे बॅलेन्स पद्धतीनं पुढे जाते आणि तुम्हाला प्रत्येक फ्रेम एन्टरटेन करते. कोणताच सीन उगाच आहे, असं वाटत नाही. दोन्ही अभिनेत्यानी भारी काम केलंय. त्यामुळे हे पार्ट तुम्ही सीरिजचा बेस्ट पार्ट आहे, असं म्हणू शकता.
कलाकारांचे अभिनय (Actors Performance)
मनोज बाजपेयीचं काम दमदार आहे, त्यानं त्याच्या चेहऱ्यावर आणलेले एक्सप्रेशन्स भारीच आहेत, त्यानं एका एजंट आणि 'फॅमिली मॅन'च्या आयुष्यातील समस्या अगदी ठळकपणे दाखल्या आहेत. जयदीप अहलावतचे सीन्स इतके जबरदस्त आहेत की, तुम्ही रिवाइंड करुन पुन्हा पुन्हा पाहाल. इथे निमरत कौरनं सर्वांची मनं जिंकलीत. एका सीनमध्ये जयदीप काहीतरी उलटं बोलतं पण, तिनं जे उत्तर दिलंय त्यावरुन स्पष्ट दिसतंय की, ती कमाल अभिनेत्री आहे. Priyamani चं कामंही उत्तम आहे. अश्लेषा ठाकूर, गुल पनाग आणि वेदांत सिन्हाही यामध्ये आपली छाप सोडतात.
रायटिंग आणि डायरेक्शन (Writing And Direction)
Raj,DK, suman kumar नं सीरिज कमाल पद्धतीनं लिहिलीय आणि त्यांनी tusshar seyth सोबत दिग्दर्शित केलीय आणि तिचं काम इमानदार आणि प्रभावी आहे. प्रत्येक सीन, पात्र आपली वेगळी छाप सोडतं.