Drishyam 3 Review: ‘दृश्यम’ ही अशी फ्रेंचायझी आहे, ज्याचा हिंदी रिमेकसुद्धा सुपरहिट ठरतो. अजय देवगन याचा रिमेक कधी आणणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मोहनलाल यांची ही फ्रेंचायझी जबरदस्त सस्पेन्स आणि थ्रिलसाठी ओळखली जाते. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यावेळीही चित्रपटाने आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. हा सिनेमा सध्या हिंदीत उपलब्ध नसला तरी मल्याळम, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये इंग्लिश सबटायटल्ससह पाहता येतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे.  (Drishyam 3)

Continues below advertisement

कथानक काय?

जॉर्जकुट्टी म्हणजेच मोहनलाल आपल्या कुटुंबाला एका अनपेक्षित गुन्ह्यापासून वाचवत आले आहेत. आता ते ‘दृश्यम’ नावाच्या चित्रपटाचे निर्माता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत जे घडलं, त्याच कथेनं प्रेरित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतो. पण पुन्हा एकदा कोणीतरी त्यांच्या कुटुंबाच्या मागे लागतो आणि त्यांना तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी ते कसे वाचणार? त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहावा लागेल.

कसा आहे चित्रपट?

चित्रपटाची सुरुवात अगदी साध्या पद्धतीने होते. आनंदी कुटुंब, शांत वातावरण आणि हळूहळू पुढे सरकणारी कथा हीच ‘दृश्यम’ची खासियत आहे. चित्रपट घाई करत नाही, पण हळूहळू प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात ओढतो. इंटरव्हलपर्यंत मुख्यतः कथानकाची बांधणी होते. मात्र सेकंड हाफमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स येतात. शेवटची काही मिनिटं अक्षरशः डोकं चक्रावून टाकतात. पुढे काय होणार याचा अंदाज बांधणं अशक्य होतं आणि क्लायमॅक्स मोठा धक्का देतो. चित्रपट कधीच ओरडून थ्रिल निर्माण करत नाही, तर शांतपणे पुढे जातो. पण लेखन इतकं दमदार आहे की नजर स्क्रीनवरून हटत नाही.

Continues below advertisement

अभिनय कसा आहे ?

मोहनलाल यांनी पुन्हा एकदा अप्रतिम काम केलं आहे. ते अगदी साध्या फॅमिली मॅनसारखे वाटतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरून पुढे काय करणार याचा अंदाज येत नाही. संपूर्ण चित्रपटाचा आधारस्तंभ तेच आहेत. मीना यांनी पत्नीची भूमिका अतिशय संयमित आणि परिपक्व पद्धतीने साकारली आहे. अंसिबा हसन हिने मोठी मुलगी अंजूची भूमिका उत्तम निभावली आहे. एस्थर अनिल दुसऱ्या मुलीच्या भूमिकेत प्रभावी वाटते. सिद्दकी आणि मुरली गोपी  यांनीही आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे.

लेखन आणि दिग्दर्शन

जिथू जोसेफ यांचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही जबरदस्त केलं आहे. चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याचं लेखन. प्रत्येक ट्विस्ट व्यवस्थित बसवण्यात आला आहे आणि दिग्दर्शनही अत्यंत प्रभावी आहे. थोडक्यात सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट आवडणाऱ्यांनी ‘दृश्यम 3’ अजिबात मिस करू नये.

रेटिंग : 4 स्टार्स