Mrs Chatterjee Vs Norway Review : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. तिच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. एका आईच्या संघर्षाची गोष्ट 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटात मांडली आहे. 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' कथा कशी आहे? हा चित्रपट बोरिंग आहे की चांगला आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...


कथानक


'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाचं कथानक हे सत्य घटनेवर आधारित आहे. ही सागरिका भट्टाचार्य यांची जीवनकहाणी आहे. ही कहाणी त्यांनी द जर्नी ऑफ मदर या त्यांच्या आत्मचरित्रात मांडली आहे. ही कथा एका भारतीय जोडप्याची आहे, जे नॉर्वेला गेले. तिथेच ते आपल्या मुलांचे पालन पोषण करत होते. नॉर्वेमध्ये राहणाऱ्या भारतीय जोडप्याच्या मुलांना चाईल्ड वेलफेअरमधील लोक आपल्यासोबत घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी सागरिका भट्टाचार्य ही कशी लढा देते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 


चित्रपट कसा आहे? 


चित्रपट चांगला आहे पण अपेक्षेइतका नाही. इंटरव्हल आधी हा चित्रपट कंटाळवाणा वाटतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहून जी भावना निर्माण झाली होती, ती भावना चित्रपट पाहून निर्माण होत नाही. चित्रपटाची कथा चांगली आहे. दुसऱ्या हाफमध्ये चित्रपट चांगला वाटतो. चित्रपटाचे काही संवाद बंगाली भाषेत आहेत तर काही इंग्रजीत आहेत.  


कलाकारांचा अभिनय


राणी मुखर्जीने 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटात चांगलं काम केलं आहे. राणीने चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये चांगला अभिनय केला आहे. चित्रपटामध्ये राणीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या अनिर्बान भट्टाचार्यने देखील चांगलं काम केलं आहे. तसेच चित्रपटातील नीना गुप्ता यांचा अभिनय देखील तुमचे मन जिंकेल. 


दिग्दर्शन 


'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अशिमा छिब्बर यांनी केलं आहे. त्यांनी दिग्दर्शन चांगलं केलं आहे. पण चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये इमोशन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. नॉर्वेमधील सीन्स आणि कोर्टमधील सीन्स चांगल्या पद्धतीने शूट करण्यात आले आहेत. चित्रपटामधील गाण्यांचे संगीतकार अमित त्रिवेदी हे आहेत. चित्रपटामधील गाणी चित्रपटाच्या कथेनुसार आहेत. पण लक्षात राहिल असं एकही गाणं या चित्रपटात नाही. एकंदरीत राणी मुर्खजीच्या दमदार अभिनयासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.