(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Half Love Half Arranged: प्रेम, लग्न आणि नात्यांची गुंतागुंत; कशी आहे 'हाफ लव्ह हाफ अरेंज' वेब सीरिज? वाचा रिव्ह्यू
Amazon Mini TV वर नुकतीच हाफ लव्ह हाफ अरेंज (Half Love Half Arranged) ही वेह सीरिज रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज "हाफ" च चांगली आहे. वाचा रिव्ह्यू...
सिमरप्रीत सिंह
मानवी गगरु, करण वाही, सुप्रिया शुक्ला
Half Love Half Arranged: सध्या ओटीटीवरीव कंटेंटचे प्रमाण वाढत आहे. अनेक वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असतात. Amazon Mini TV वर नुकतीच हाफ लव्ह हाफ अरेंज (Half Love Half Arranged) ही वेह सीरिज रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज "हाफ" च चांगली आहे.
कथानक
स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. रियाची कथा हाफ लव्ह हाफ अरेंज या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. रिया ही तिचं आयुष्य छान नियोजन करून जगते, कोणत्या वयात काय करायचं? हे सगळं तिने तिच्या खोलीच्या भिंतीवर लिहिलेलं असतं. तिचा एक प्रियकर आहे जो तिची फसवणूक करतो आणि तेही जेव्हा ती त्याच्या प्रपोजलची वाट पाहत असते. इथेच कथा रंजक बनते. तिला पुढील सहा महिन्यांत लग्न करावे लागणार असते कारण ती 30 वर्षांची आहे. आता तिला लग्नासाठी मुलगा सापडत नाही. मग ती तिच्या मावशीची मदत घेते जी राजौरी गार्डनची व्यावसायिक मॅच मेकर आहे. आता इथे तिला अनेक मुलं भेटतात. पण तिचं लग्न होतं का? तुम्हाला हे तुम्हाला वेब सीरिज पाहिल्यानंतरच कळेल. Amazon. Mini TV वर ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. याचे 6 भाग आहेत आणि प्रत्येक भाग 20 - 22 मिनिटांचा आहे.
कशी आहे वेब सीरिज?
हाफ लव्ह हाफ अरेंज या वेब सीरिजमध्ये मानवी गागरू आणि करण वाही हे मुख्य भूमिकेत आहेत. ही एकदम फ्रेश जोडी आहे. वेब सीरिजमध्ये अनेक चांगल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्याशी तुम्ही रिलेट करू शकता. डॉ. रियाचे फॅमिली खूप इंटरेस्टिंग आहे.. त्यांचे सीन्स खूप छान आहेत, आपल्या आई-वडिलांचा काळ आणि आपला काळ यांच्यातील फरक, विशेषत: मुलगा आणि मुलगी यांच्या विचारसरणीत किती फरक पडला आहे, हे वेब सीरिजमध्ये छान पद्धतीनं दाखवले आहे. वेब सीरिजमध्ये अनेक चांगले संदेश देखील दिले गेले आहेत. तुम्ही ही वेब सीरिज तुमच्या कुटुंबासह आरामात पाहू शकता.यात अनेक ट्विस्ट आहेत पण अनेक सीन्स उगाच वाढवले गेले आहेत, असे वाटते. अनेक ठिकाणी कथेच्या मधोमध इतर अनेक कथा घातल्या आहेत ज्या फारशा वास्तविक वाटत नाहीत. असे वाटते की या कथेची गरज नव्हती. वेब सीरिजमधील संगीत अजिबात चांगले नाही.अनेक ठिकाणी संगीत आणि सीन्स यांच्यामध्ये साम्य वाटत नाही. वेब सीरिजचा शेवटचा एपिसोड चांगला आहे, पण वेब सीरिजचा शेवट नाही. वेब सीरिजचा शेवट अजिबात प्रभावी नाही.
कलकारांचा अभिनय
मानवीने डॉ. रियाची भूमिका चांगली पार पाडली आहे. करणनेही चांगला अभिनय केला आहे. कुटुंबाचे कास्टिंग देखील चांगले आहे आणि प्रत्येकाने चांगले काम केले आहे.एकंदरीत, ही वेब सीरिज वन टाइम वॉच आहे. जर तुम्हाला नवीन जोडी पहायची असेल तर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.