Alpha Review: ज्या सिनेमात सर्वात मोठा एजंट गुप्ता बर्गर सेंटरटे फ्रेंच फ्राईज खाताना एन्ट्री घेतो, तेव्हा त्याचा उद्देश तुमच्या लक्षात येतोच. मी मुद्दाम इथे 'गुप्ता बर्गर सेंटर'चा उल्लेख करतोय, कारण त्या फ्राईज दुचाकीवरून नेण्यासाठी योग्य अशा पॅकिंगमध्येही नसतात. या सिनेमाची 'धुरंधर' सोबत तुलना करुन, ट्रोल केलं जात होतं, पण ही फिल्म 'धुरंधर'च्या आधी आलीच असती, तरीसुद्धा ही फिल्म तेवढीच खराब वाटली असती. ही फिल्म त्याच जुन्या साच्यात घालून बनवली आहे, ज्याला कित्येक दिवसांपूर्वीच प्रेक्षकांनी नाकारलंय. 

Continues below advertisement

आलिया भटच्या 'अल्फा'ची कथा (Alia Bhatt Alpha Review)

'अल्फा'ची कथा एका प्रोग्रामभोवती फिरते. बॉबी देओल 'सीता' नावाच्या एका मुलीचा सांभाळ करतो आणि तिला एका विशिष्ट मिशनवर पाठवतो. 'अल्फा' नक्की कोण आहे? तिचं कुटुंब कुठे आहे? बॉबीला ती कशी सापडली? हे मिशन यशस्वी होईल का? याबद्दल मी फार काही सांगणार नाही. कारण सिनेमात पाहण्यासारखं तसंही फार काही नाहीच, आणि जर मी थोडंसं जरी सांगितलं, तर ज्यांनी आधीच तिकिटं काढलीत, तेसुद्धा सिनेमा पाहायला येणार नाहीत.

Continues below advertisement

आलिया भटचा 'अल्फा' नेमका आहे तरी कसा? (Alia Bhatt Alpha Story)

ही एक अत्यंत खराब फिल्म आहे, इथे त्याच गोष्टी दाखवण्यात आल्यात, ज्या पाहून प्रेक्षकांना आधीच वीट आलाय. या सिनेमात काहीच नवं नाही, अॅक्शन सीन्स अगदीच बालीश वाटतात, त्याला कोणतंही लॉजिक नाही, एकीकडे पीक डिटेलिंगच्या गोष्टी सुरू आहेत आणि इथे पीकमध्ये अशा गोष्टी केल्यात, ज्या पाहून हसू आवरत नाही. एका सीनमध्ये मुलगी आणि वडील भेटतात, मुलगी एका ठिकाणी डान्स करतेय आणि ते एकमेकांशी बोलतात, तेव्हा ते स्टेडियममध्ये दिसतात. तिथेच कुठल्याचरी कॅफेमध्ये जाऊन बसतात, एका ठिकाणी एजंट दुसऱ्याच्या घरातून जात असतो आणि मग थांबून त्यालाच म्हणतो, चल निकल, अॅक्शन सीन्सचा अजिबातच ताळमेळ नाही, आलिया जरी अल्फा असली, पण ती या भूमिकेत योग्य वाटतच नाही. फिल्म लॉजिकला विसरुन जाते आणि शेवटी पुन्हा तेच सगळं होतं, जे लोकांना यशराजच्या स्पाय युनिवर्समध्ये अजिबातच पाहायचं नव्हतं.  नको तिथे गाणी आणि तीसुद्धा ऐकावीशी न वाटणारी, जे तुमचा राग आणखी वाढवतात. यानंतर आता हे युनिवर्स बंद करावं, किंवा काही वर्ष थांबून काहीतरी चांगलं बनवावं, कारण हा सिनेमा म्हणजे, 'टायगर', 'पठाण', 'कबीर'चा अपमान आहे.

'अल्फा'मधल्या स्टारकास्टचा अभिनय कसा? (Alia Bhatt Sharvari Wagh Alpha Movie Star Cast)

आलिया एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, पण सिनेमात ती प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलीय. ही भूमिका तिला साजेशी नाही आणि ॲक्शन सीन्समध्ये ती अजिबात पटण्यासारखी वाटत नाही. ती ओव्हरॲक्टिंग करत असल्याचं आणि विचित्र हावभाव करत असल्याचं सारखं जाणवतं. शर्वरीबद्दल बोलायचं तर, जी लोक ती आलियापेक्षा चांगली दिसत होती असं म्हणत होते, ते चुकीचे होतं. तिची कामगिरीही तितकीच खराब आहे. बॉबी देओल चांगला दिसतो, पण हरियाणवी लहेजा साकारताना त्यानं त्याची पूर्ण वाट लावली आहे, त्यानं तसा प्रयत्न करायला नको होता, कारण ते खूपच खटकतं. अनिल कपूर त्यांच्या भूमिकेत ठीकठाक वाटतात.

'अल्फा'चं रायटिंग अन् दिग्दर्शन (Alpha Movie Box Office Collection)

उदय चोप्रा यांची कथा बरीच कमकुवत आहे. कथानकात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासारखं काहीही नाही आणि शिव रवैल यांचं दिग्दर्शन तर कथेपेक्षाही अधिक सुमार आहे.

एकंदरीत, हा सिनेमा फारच निराशाजनक आहे.

रेटिंग : 1.5 स्टार्स