Adolescence Review : एका 13 वर्षांच्या मुलावर हत्येचा आरोप हे, पण ही सीरिजमर्डर मिस्ट्री नाही, काहीतरी वेगळीच हे, जी सर्वांनी नक्की पाहावी. Netflix च्या या सीरिचं प्रत्येकजण कौतुक करतोय, अनेकांना ही सीरिज खूपच आवडली आहे. त्यासाठी कारणंही तसंच आहे. 


वेब सीरिजची पटकथा


वेब सीरिजची सुरुवात एका 13 वर्षांच्या मुलाच्या अटकेपासून होते, आणि त्याला अगदी एका दहशतवादासारखी अटक केली जाते, पोलीस घराचा दरवाजा तोडून आत जातात, पण त्यानं हे का केलं? त्यानं कोणाची हत्या केली? हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, त्यानं हे का केलं? आणि आजच्या मुलांच्या मनात काय चाललं आहे? शाळेत त्याच्यासोबत होणाऱ्या छळाचा त्याच्यावर कसा परिणाम होतोय? हे ही वेब सीरिज खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते, नक्की काय घडतं, हे समजून घेण्यासाठी, नक्की पाहा.


कशी आहे वेब सीरिज? 


नव्या रिलीज झालेली नेटफ्लिक्सवरची मालिका सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. ही वेब सीरिज फक्त तुमचं मनोरंजन करत नाही, तर या सीरिजमधून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. या सीरिजची प्रत्येक फ्रेम मनोरंजक आहे. एका घटनेची चौकशी ज्या पद्धतीनं घडते, ती तुम्हाला खिळवून ठेवते. या चौकशीवेळी मुलाचं मन ज्यापद्धतीनं वाचलं जातं, ते तुम्हाला भंडावून सोडतं. ही सीरिज पाहताना तुम्हाला वाटतं की, तुम्ही काहीतरी नवीन पाहत आहात, ज्याची रायटिंग, ट्रिटमेंट, परफॉर्मन्स सर्वकाही शानदार आणि क्लासी आहे. ही सीरिज पालकांनी तर पहावीच, पण त्यासोबतच मुलांनीही पाहावी. सोशल मीडियाच्या जगात मुलं काय करतात? त्यांचे पालक समजू शकत नाहीत, ही सीरिज सांगते की, इमोजी मुलांची मानसिक स्थिती कशी बिघडवू शकतात. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इमोजी मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात, पण पालकांना त्याबाबत साधी कुणकुणही लागत नाही. 


अभिनय 


सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे, owen cooper नं 13 वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. तो स्वतः 15 वर्षांचा आहे. या सीरिजमधून त्यानं पदार्पण केलं आहे. त्यानं दाखवून दिलं आहे की, तो इंडस्ट्रीतला एक दमदार अभिनेता बनणार आहे. त्यानं एवढा दमदार अभिनय केला आहे की, एक मूल असं काम करू शकतं यावर विश्वास ठेवणं थोडे कठीण आहे, स्टीफन ग्राहमनं या मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत चांगलं काम केलं आहे, अॅशले वॉल्टर्सनं पोलिसाची भूमिका केली आहे आणि त्याचं काम उत्कृष्ट आहे, त्याचा स्वतःचा मुलगा देखील त्याच शाळेत शिकतो, जिथे एका विद्यार्थ्याची हत्या झाली होती, पोलिसांच्या माध्यमातून पालकत्वाचीही चर्चा झाली आहे.


दिग्दर्शन


जॅक थॉर्न (Jack Thorne) आणि स्टीफन ग्रॅहम (Stephen Graham) यांनी ही वेब सीरिज लिहिली आहे आणि फिलिप बारांटिनी (Philip Barantini) यांनी ती दिग्दर्शित केली आहे आणि त्यांचं काम अद्भुत आहे, या सीरिजचा आत्मा त्याचं लेखन आहे आणि दिग्दर्शनानं चांगलं लेखन एका वेगळ्या पातळीवर नेलं आहे.


त्यामुळे न विसरता ही सीरिज नक्की पाहा!


रेटिंग : 3.5 Stars