Women Health: कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी, महिलांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी! कर्करोगाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त...
Women Health: तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महिला अनेकदा त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; ज्यावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

Women Health: महिलावर्ग अनेकदा लाज वाटते म्हणून.. किंवा अपराधीपणाच्या भावनेमुळे, भीतीमुळे आपल्या आरोग्यासंबंधीत समस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा करत नाहीत, खुला संवाद साधणे टाळतात. एखादी समस्या आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात आणि आपल्याला होणारा त्रास निमूटपणे सहन करत राहतात. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळे गंभीर आजारांसह कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अखिला रेड्डी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या...
घरातील प्रत्येक महिलेला 'याची' जाणीव झालीच पाहिजे...(Women Health)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नियमित तपासण्या टाळणे, लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आणि उपचारास विलंब करणे ही एक गंभीर बाब असून, यामुळे अनेक आजार बळावतात. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक महिलेला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधताना आपल्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते याची जाणीव झाली पाहिजे. योग्य वेळी निदान झाल्यास बऱ्याच कर्करोगांवर यशस्वी उपचार शक्य आहेत.
'अशा' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका...
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सामान्यतः 25 ते 65 वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोग आढळून येतो. स्तनात गाठ, स्तनांच्या आकारात बदल किंवा स्तनाग्रातून स्त्राव अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. गर्भाशय मुखाच्या कर्करोगात असामान्य रक्तस्राव दिसून येऊ शकतो. अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण असते, मात्र पोट फुगणे, पोटदुखी किंवा लवकर पोट भरल्यासारखे वाटणे या अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. गर्भाशयाच्या कर्करोगात अनियमित रक्तस्त्राव किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव गंभीर असू शकतो. महिलांनी असामान्य वेदना, रक्तस्राव किंवा अचानक वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मॅमोग्राफी, पॅप स्मीअर आणि पेल्विक तपासणी यांसारख्या नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्यासाठी योगा व ध्यान यांचा अवलंब करावा तसेच धूम्रपान व मद्यपानाचे सेवन टाळावे
कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी...
तज्ज्ञ सांगतात... कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास कर्करोगावरही मात करता येते आणि निरोगी जीवन जगता येऊ शकते.
हेही वाचा :
Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Before You Go
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण






















