Continues below advertisement

Women Health: ते म्हणतात ना, बाळाचा जन्म म्हणजे आईचाही दुसरा जन्मच असतो. 9 महिने बाळाला पोटात वाढवताना एका महिलेला अनेक लहान - मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशात गरोदर महिलांमध्ये सर्वाधीक प्रमाणात आढळून येणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. प्रसुतीनंतर काही स्त्रियांना आतडे तसेच जठरासंबंधीत समस्या उद्भवतात. या समस्या यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि पाचन तंत्राव्यतिरिक्त इतर पाचक अवयवांवरही विपरीत परिणाम करतात. काही स्त्रियांना गर्भधारणेपुर्वीच पोटासंबंधी तक्रारी उद्भवतात ज्या गर्भवस्थेत आणखीच वाढू लागतात. बद्धकोष्ठता तेव्हा होते जेव्हा आतड्यांची हालचाल मंदावते आणि मल विसर्जनास समस्या येतात. ही केवळ प्रौढांमध्येच नाही तर गर्भवती महिलांमध्येही आढळून येणारी एक सामान्य समस्या आहे. याबाबत मुंबई येथील झायनोव्हाशाल्बीहॉस्पिटलच्यास्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. प्रियंकासोनवणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे..

गरोदर महिला अनेकदा बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करतात..

डॉक्टर सांगतात, गर्भवती महिलांमध्ये बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केले जाते. 40 ते 50% गर्भवती महिलांना कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा अनुभव येतो. अनेक महिलांना असे वाटते की ही एक किरकोळ समस्या आहे जी स्वतःहून निघून जाईल, परंतु अनियंत्रित बद्धकोष्ठतेमुळे दैनंदिन कार्यात अडथळा येणे, भूक, झोप आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Continues below advertisement

काय आहेत कारणं?

स्त्रीरोग तज्ज्ञसांगतात,गर्भधारणेदरम्यानबद्धकोष्ठता होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हार्मोनल बदल. प्रोजेस्ट्रॅानची पातळी वाढल्याने पचनसंस्थेतील स्नायूंच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे आतड्यांमधून अन्न आणि मलची हालचाल मंदावते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. वाढणारे गर्भाशय देखील आतड्यांवर दाब निर्माण करते, ज्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित होते आणि मल बाहेर पडण्यास त्रास होतो. हा दाब विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्यातिमाहीत वाढतो. गर्भधारणेदरम्यान अनेक महिला निरोगी हिमोग्लोबिन पातळी राखण्यासाठीलोहयुक्त आहार देखील घेतात. ते देखील मल कडक करू शकतात आणि बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात.

कशी होते गुंतागुंत?

स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात, पोटात अस्वस्थता जाणवणे, पोट फुगणे, मूळव्याध किंवा गुद्दाशयाला जखम होणे अशा समस्या सतावतात. यामुळे अनावश्यक चिंता, झोपेचा त्रास देखील होऊ शकतो. सुदैवाने, तज्ज्ञांच्या मदतीने गर्भधारणेदरम्यानबद्धकोष्ठताव्यवस्थापित केली जाऊ शकते.

'या' महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा

स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात, गर्भवती महिलांनी किमान 12 ते 15 ग्लास पाणी प्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय राहण्यास मदत होईल. फळे, भाज्या, तृण धान्य आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा फायबरयुक्त आहार घ्या आणि आतड्यांच्या हालचाली सुधारा. चालणे किंवा प्रसूतीपूर्वयोगसाधना यासारख्या क्रियांनी आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते. जेवणाणामध्ये जास्त अंतर ठेवू नका. तज्ञ तुमच्या लोह पूरक आहारांमध्ये बदल करतील, गरोदरपणात सुरक्षित असलेल्या स्टूलसॉफ्टनरची शिफारस करतील आणि वैयक्तिक गरजांनुसार आहारात बदल सुचवतील. गर्भवती महिलांनी केवळ तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

हेही वाचा

Winter Care: वाढती थंडी, स्नायूंवर दबाव, पाठदुखीच्या समस्यांमध्ये होते वाढ, सांध्याची काळजी घेणं गरजेचं, तज्ज्ञ सांगतात...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)