Winter Travel: नात्यात अनेकदा कामाचा ताण, बदलती जीवनशैली, अनेक जबाबदाऱ्यांमुळे जोडीदार एकमेकांना वेळ देता येत नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. मग भांडणं.. वाद...एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवणं या गोष्टी होतात.. एक वेळ अशी येते की जोडीदारासोबतचे नाते शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचते. कारण तुम्ही रोजच्या वादाला कंटाळून जाता. जर तुम्हालाही तुमच्या नात्याबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्ही जोडीदाराला व्यस्त जीवनातून वेळ दिला पाहिजे, वेळोवेळी सरप्राईज दिले पाहिजे. तसेच जसा वेळ मिळेल तसे सहलींचे नियोजन करत राहिल्यास, जोडीदारांना एकमेकांसोबत एकांतात वेळ घालवण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. आज आम्ही तुम्हाला लोणावळ्यातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुमच्या नात्यात गोडवा येईल... जाणून घ्या..


नात्यात वाद हे आलेच...!


असे कोणतेही नाते नसते ज्यात भांडण किंवा वाद नसतात. ती टिकवण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. भांडण म्हणजे नातं संपवणं असं होत नाही. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर वारंवार रागावत असेल, तर तुम्ही त्याला पटवून देत राहावे. बऱ्याचदा लोकांच्या मनात ही भावना असते की, त्याच माणसाला पुन्हा पुन्हा का पटवायचे? समोरची व्यक्ती प्रयत्न करू शकत नाही का? हे तेव्हाच होईल जेव्हा तो तुमचे प्रयत्न पाहील.


जोडीदाराला पुन्हा पुन्हा सरप्राईज देत राहा..


रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, जेव्हा तुम्ही जोडीदारालाठी काहीतरी खास करत राहता आणि तुमच्या जोडीदाराला पुन्हा पुन्हा सरप्राईज करत असता, तेव्हा नातं आणखीन फुलतं तसेच त्याला नवी झळाळी मिळते. कारण जोडीदाराला भीती वाटू लागते की जी व्यक्ती इतकी वर्षे आपण एकत्र होती, ती आता आपल्यापासून दूर जाईल. नातेसंबंध खराब होत असताना तुमचे प्रेम आणि प्रयत्न फळ देतात. म्हणूनच असं म्हणतात की, नाती घट्ट करण्यासाठी वेळोवेळी सरप्राईज ट्रिपचे नियोजन करत राहावे. असे केल्याने नात्यांमध्ये उत्साह आणि रस निर्माण होतो. महाराष्ट्रात असे काही हिल्स स्टेशन आहेत, जिथे सध्या अगदी गुलाबी थंडी आणि रोमॅंटिक वातावरण पाहायला मिळतंय. त्यात लोणावळा तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता.





लायन्स पॉइंट, लोणावळा


पत्नीला सरप्राईझ देण्यासाठी लोणावळा अगदी उत्तम ठरेल, इथले सुंदर दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही हे ठिकाण कधीही विसरू शकणार नाही. जर नात्यात खूप कटुता आली असेल आणि एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येत असतील तर शांततेचे क्षण घालवण्यासाठी इथे गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या कुशीत एकांतात वेळ घालवता तेव्हा तुम्हाला एकमेकांशी अधिक बोलण्याची संधी मिळते. लायन्स पॉइंट हे जोडप्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही नोव्हेंबरला भेट देण्याची योजना करू शकता. इथले सुंदर नजारा पाहायला जरूर जा.


स्थान- लोणावळा रेल्वे स्थानकापासून 12 किमी. येथे जाण्यासाठी तुम्हाला भुशी डॅम आणि ॲम्बी व्हॅलीमधून जावे लागेल.




राजमाची पॉइंट, लोणावळा


करवा चौथच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते दृढ करण्यासाठी तुम्ही राजमाची पॉइंटलाही भेट देऊ शकता. तुम्ही 3 दिवसांच्या सहलीचा प्लॅन केला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही थंडीतली रात्र डोंगरावर वसलेल्या एका सुंदर हॉटेलमध्ये घालवू शकता. यानंतर, दिवसा तुम्ही राजमाचीला भेट द्यावी, लोणावळ्यातील एक सुंदर ठिकाण राजमाची किल्ला देखील आहे. आजूबाजूची दरी आणि धबधबे पाहण्यासाठी तुम्ही येथे भेट द्यायलाच हवी.


स्थान- लोणावळा रेल्वे स्थानकापासून येथे जाण्यासाठी तुम्हाला 6 किमी अंतर कापावे लागेल, तर खंडाळा रेल्वे स्थानकापासून ते 2.5 किमी अंतरावर आहे.




कुणे धबधबा


लोणावळ्यात जाऊन कुणे धबधबा दिसला नाही तर तुम्ही काहीच पाहिलं नाही. जर तुम्हाला जोडीदाराला सरप्राईझ द्यायचं असेल, तसेच हा खास दिवस धबधबा बघत घालवायचा असेल तर तुम्ही इथे जाण्याचा प्लॅन करू शकता. 3 दिवसांच्या सहलीचे नियोजन करणाऱ्यांसाठी ही तीन ठिकाणं उत्तम आहेत. प्रत्येक वेळी सगळे सण घरीच साजरा करता, आता दिवाळीही संपलीय. मग या वेळी तुमच्या बायकोला कुठेतरी बाहेर नक्कीच घेऊन जाऊ शकता. हे तुमच्या पत्नीसाठी देखील एक भेट असेल आणि तुमचा मूड देखील ताजा राहील. भारतातील रोमँटिक ठिकाणांपैकी एक मानले जाते.


स्थान- खंडाळा रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी तुम्हाला 2 किमी अंतर कापावे लागेल. याशिवाय, हे लोणावळा रेल्वे स्थानकापासून 3.5 किमी अंतरावर आहे. तुम्ही मुंबई आणि पुण्याहून येत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला 94 किमी आणि 70 किमीचे अंतर कापावे लागेल. त्यामुळे तुम्ही त्यानुसार सहलीचे दिवस निवडले पाहिजेत.


हेही वाचा>>>


Winter Travel: मुंबई-ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर 'ही' मनमोहक ठिकाणं, थंडीत वीकेंड डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )