मुंबई  : उजवीकडे (Right) आणि डावीकडे (Left) यातील फरक समजने ही साधरण गोष्ट आहे. परंतु, नुकत्याच एका संशोधनातून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर 6 पैकी एका व्यक्तीला डावे आणि उजवे यातील फरत लक्षात येत नाही, SAGE जर्नलच्या अहवालातून बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, 2020 मध्ये व्हॅन डर हॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की जवळपास  15 टक्के लोकांना डावे आणि उजवे यातील फरक समजण्याची समस्या आहे.  


अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, संशोधन करण्यासाठी अनेक लोकांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. यातील अनेकांना उजवीकडे आणि डावीकडील यातील फरक स्पष्ट करण्यासाठी हाताच्या चिन्हांचा वापर केला. परंतु, बऱ्याच लोकांना हा फरत लक्षात आला नाही.  


काय म्हटले आहे संशोधनात?


ब्रिटनचे प्रख्यात न्यूरोसर्जन हेन्री मार्श यांनी त्यांच्या 'ए लाइफ इन ब्रेन सर्जरी' या पुस्तकात लिहीले आहे की, त्यांनी एका रुग्णावर मेंदूची चुकीची शस्त्रक्रिया केली. कारण त्यांना उजवीकडे आणि डावीकडील फरक लक्षात आला नाही. याबरोबरच 2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फिलिपाइन्सच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी ट्रम्प यांना उलट हात हलवण्यास सांगितले असता ते संतप्त झाले. यानंतर उजवे आणि डावे यांच्यातील फरकाची चर्चा सुरू झाली.  


डॉक्टरांवरही  परिणाम


बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंडचे प्रोफेसर जेराल्ड गोर्मले यांनी वैद्यकीय शिक्षण नावाचा एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. या संशोधनात असे म्हटले आहे की, अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना उजवे आणि डावे यातील फरक करण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याकडे वैद्यकीय शास्त्राने खूप लक्ष देण्याची गरज असल्याचे संशोधन अहवालात म्हटले आहे. ही समस्या दूर न केल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णांवर होऊ शकतो.


संशोधनानुसार, प्रौढांच्या तुलनेत मुले उजवीकडे आणि डावीकडे यातील फरक तात्काळ ओळखू शकतात. फ्रान्समधील ल्योन न्यूरोसायन्स रिसर्च सेंटरमधील अॅलिस गोमेझ आणि त्यांच्या टीमने यावर संशोधन केले आहे. संशोधनात त्यांना असे आढळले की मुले उजवीकडे आणि डावीकडे यातील फरक ओळखण्यात कमी चुका करतात. या संशोधनात सहभागी झालेल्या सर्व मुलांचे वय 5 ते 7 या दरम्यान होते.  याबाबत व्हॅन डेर हॅम म्हणतात की, "जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एखादे मूल दिशा सांगण्यासाठी पुढे असेल ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल.   


असा ओळखा उजवा आणि डाव्यातील फरत  


जर तुम्ही तुमच्या डाव्या हाताचे पहिले बोट अंगठ्याने जोडले तर तुम्हाला इंग्रजी अक्षर b सारखा आकार दिसेल. या b चा अर्थ Baayaan म्हणजेच डावीकडे आहे. त्याचप्रमाणे उजव्या हातानेही असे केल्यास d या इंग्रजी अक्षरासारखा आकार दिसेल. या d चा अर्थ आहे दयान (Daayan) म्हणजे उजवा.


याचा धोका काय आहे? 


अजवीकडे आणि डावीकडे समजत नसल्याने त्याचे धोके देखील अनेक आहेत. जेरार्ड गोर्मले यांच्या मते, हेन्री मार्शप्रमाणे शस्त्रक्रिया करताना डॉक्टर उजवा आणि डावीकडील फरक विसरले त्यामुळे त्यांची चूक रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. याबरोबरच टायटॅनिक जहाजाचा चालक उजवीकडे वळण्याऐवजी डावीकडे वळला असता तर जहाज बुडण्यापासून वाचले असते, असे गोर्मले यांनी म्हटले आहे.