ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर या गोष्टी सर्च करु नका!
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 01:12 PM (IST)
NEXT PREV
मुंबई : ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर अनेक खाजगी गोष्टी सर्च केल्या जातात. ब्राऊजर आणि सिस्टीम हिस्ट्री क्लीअर केल्यानंतर आपण काय सर्च केलं ते दिसणार नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र तुम्ही केलेल्या सर्फिंगची सर्व माहिती आपोआप सेव्ह होते. अॅडल्ट वेबसाईट्स : एका रिपोर्टनुसार ग्रेट ब्रिटनच्या संसदेच्या कार्यालयात 3 लाखांपेक्षा जास्त अॅडल्ट विषय सर्च केले जातात. अशा वेबसाईट सर्च करताना आढळल्यास नोकरीवरुन काढून टाकल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. ऑफिसची खाजगी माहिती : ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर काही गोष्टी सुरक्षित केलेल्या असतात. मात्र त्यानंतरही संबंधित वेबसाईट किंवा फोल्डर ओपन करण्याचा प्रयत्न करु नये. कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आयटी टीमला मिळते. साईड जॉब सर्च : एका कंपनीत नोकरी करत असताना दुसऱ्या कंपनीची नोकरी किंवा व्यवसाय करण्यासंबंधीत माहिती ऑफिसमध्ये शोधू नये. यामुळे नोकरीही गमवावी लागू शकते. नोकरी संबंधित वेबसाईट्स : ऑफिसमध्ये नव्या नोकरीबाबत काहीही सर्च करु नये. नवीन जॉब शोधायचा असल्यास स्वतःच्या कॉम्प्यूटरचा वापर करावा. सोशल लाईफ संबंधित वेबसाईट्स : कामाच्या वेळेत तुम्ही खाजगी गोष्टी सर्च केलेल्या कोणतीही कंपनी खपवून घेणार नाही. त्यामुळे बर्थ डे पार्टी, लग्न, सुट्टींचे स्थळं या गोष्टी ऑफिसमध्ये सर्च करणं टाळावं. डेटिंग आणि रिलेशनशीप : ऑफिसमध्ये असताना लव्ह लाईफला दूर ठेवावं, असा सल्ला जाणकार देतात. डेटिंग वेबसाईट्स, प्रेमासंबंधी माहिती या गोष्टी ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर सर्च करु नयेत. जास्त सर्फिंग करु नये : ऑफिसमध्ये वेळ घालवण्यासाठी इंटरनेटवर सर्फिंग करणं टाळावं. अनेकदा क्रिकेट स्कोअर, शेअर मार्केट आणि कधी बातम्या अशा गोष्टी सर्च केल्या जातात. मात्र ऑफिसमध्ये जास्त सर्फिंग करु नये.