संशोधन : ... तर वजन कधीच कमी होणार नाही
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या संशोधनानुसार जे लोक जेवणाचा आनंद घेतात, ते नेहमी खूश राहतात. तसेच त्यांचे वजनही कमी राहते. जे लोक कमी पण प्रसन्न मनाने जेवण करतात ते नेहमी स्लीम आणि फीट राहतात, असं संशोधनात म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही कमी अन्न मोठ्या आनंदाने खात असाल तर वजन कमी होण्यास मदत होते, असं सर्वेक्षणात आढळून आलं.
ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटचा स्वाद घेतला त्यांना चॉकलेट खाण्याचा आनंद मिळाला. मात्र ज्यांनी एकदाच सर्व तुकडा खाल्ला, त्यांना चॉकलेटचा स्वाद घेता आला नाही. मोठा तुकडा खाणाऱ्यांना चव घेण्यापेक्षा पोट आणि पैशांची जास्त चिंता होती, असं सर्वेक्षणात आढळून आलं. तसेच वजनही जास्त असल्याचे आढळून आले.
केक आणि चॉकलेटचा तुकडा उचलताना काहींनी चॉकलेटचा छोटासा तुकडा घेतला तर काहींनी मोठा तुकडा घेतला.
संशोधनासाठी जवळपास 200 जणांना वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि चॉकलेट खाण्यासाठी दिले.
डेली मेलच्या संशोधनानुसार जे लोक वजना कमी करण्याच्या चिंतेने त्रस्त आहेत, अशांचं वजन कधीच कमी होत नाही. एवढेच नव्हे तर आनंदाने आहार घेतला नाही, तरीही वजन कमी होत नाही, असं संशोधनात म्हटलं आहे.
अनेकांना वजनाची चिंता नेहमी सतावते. त्यामुळे जेवन करतानाही किती खावं, याबाबत मनात संभ्रम असतो. परिणामी आनंदाने जवण करता येत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -